Love Serial sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : ‘लव्ह’ : नातेसंबंधांचे वास्तव

आधुनिक जगातील प्रेमसंबंध नि लैंगिक नातेसंबंधांचे बदलते स्वरुप याविषयीच्या बऱ्याचशा मालिका गेल्या काही काळात पाहायला मिळाल्या आहेत.

अक्षय शेलार shelar.a.b.mrp4765@gmail.com

आधुनिक जगातील प्रेमसंबंध नि लैंगिक नातेसंबंधांचे बदलते स्वरुप याविषयीच्या बऱ्याचशा मालिका गेल्या काही काळात पाहायला मिळाल्या आहेत. जो स्वानबर्गने नेटफ्लिक्सकरिता निर्माण केलेली ‘इझी’ किंवा जॉन कार्नीने ॲमेझॉन प्राईमकरिता केलेल्या ‘मॉडर्न लव्ह’सारख्या मालिकांचा यात समावेश होतो.

या मालिका अँथॉलॉजी प्रकारातील असल्याने निर्माते तसेच प्रेक्षकांना समोरील पात्रांच्या आयुष्यात केवळ मर्यादित कालावधी, मर्यादित स्वरूपात डोकावता येते. साहजिकच या स्वरपूामुळे या मालिकांना काही मर्यादा येतात. नेटफ्लिक्सच्या ‘लव्ह’ या मालिकेच्या संदर्भात मात्र असे घडत नाही.

जुड ॲपेटो, लेस्ली अर्फीन आणि पॉल रस्ट यांनी निर्माण केलेली ‘लव्ह’ (२०१६-१८) ही मालिका. समकालीन जगातील नातेसंबंधांकडे शक्य तितक्या वास्तववादी स्वरूपात पाहणारी मालिका म्हणून या मालिकेची निर्मिती केली गेली होती. ‘वी हॅव्ह ऑल बीन देअर’ या टॅगलाइनपासूनच मालिकेचा सर्वसमावेशक दृष्टिकोन स्पष्ट होतो.

ज्यात मध्यवर्ती जोडप्याच्या माध्यमातून प्रेमसंबंधांकडे स्त्री आणि पुरुष अशा दोघांच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. दोघांचा भूतकाळ, जुन्या नात्यांमुळे पदरी पडलेली निराशा आणि या साऱ्याने वर्तमानातील जगण्यात जाणवणारे भावनिक ओझे अशा अनेकविध मुद्द्यांना इथे स्पर्श केला जातो.

मिकी (गिलियन जेकब्स) आणि गस (मालिकेचा सह-निर्माणकर्ता व अभिनेता पॉल रस्ट) या दोघांचेही व्यावसायिक जीवन फारसे समाधानकारक नाही. मिकीला दारू आणि अंमली पदार्थांसोबतच प्रेम आणि शारीरिक संबंधांचे व्यसन आहे. ती या साऱ्या व्यसनांपासून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नांत आहे. तर, गस हा पुस्तकी कीडा प्रकारातील मनुष्यप्राणी आहे.

त्याची जीवनशैली, त्याचे विचार मिकीहून बरेच वेगळे आहेत. तरीही प्रेमाविषयीच्या प्रत्येक कथेत घडते त्यानुसार काहीशा अनपेक्षितरीत्याच या दोघांची भेट घडते आणि दोघांना एकमेकांविषयी आकर्षण वाटू लागते. मात्र, दोघांचा भूतकाळ आणि वर्तमान पाहता त्यांचे प्रेमजीवन सोपे नि सुकर असेल, असे स्वतः त्यांनाही वाटत नसते.

मिकी आणि गस दोघांनाही स्वतःखेरीज कुणाही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यास अडचणी येत असतात. हेच एकमेकांच्या बाबतीत घडत राहते. प्रेमामध्ये समोरच्या व्यक्तीच्या आधीन होणे अपेक्षित असते, आणि नेमके हेच त्या दोघांना सहजासहजी जमत नसते. त्यात त्यांचा आत्मघातकी स्वभाव त्यांच्या अडचणींमध्ये भर घालतो.

आधुनिक जगातील नात्यांचे हे असे स्वार्थी नि आत्मघातकी स्वरूप मिकी आणि गसच्या कथेला, त्यांच्या जगण्यातील समस्यांना वास्तववादी स्वरूप प्राप्त करून देते. ज्यात आपापल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या चुका करणारी ही पात्रं मालिकेच्या निर्माणकर्त्यांच्या प्रामाणिक नि त्याचवेळी कल्पक विचारांमुळे साचेबद्ध ठरत नाहीत. यापूर्वी काही सिनेमे आणि मालिकांमध्ये दिसलेल्या ओळखीच्या संकल्पना निवडूनही हे कसे साध्य केले जाते, यासाठी ही मालिका जरूर पाहावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

Latest Maharashtra News Updates : शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर बैठक

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

Jowar-Beet Crackers :थंडीत चविष्ट आणि हेल्दी स्नॅक खावंसं वाटतं? घरच्याघरी बनवा ज्वारी-बिटचे क्रॅकर्स!

Vikas Thackeray : त्सुनामीच्या लाटेत पश्चिमने तारला ‘पंजा’...जनतेची मिळाली ‘विकास’ला साथ

SCROLL FOR NEXT