akshaya and hardik 
मनोरंजन

राणासोबत पाठकबाईंचा रोमँटिक Reel व्हिडीओ; चाहत्यांनी विचारलं, 'डेट करताय का?'

सकाळ ऑनलाइन

छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला व त्यातील कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. 'चालतंय की' म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा या मालिकेतील पहिलवान गडी राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीची लोकप्रियता प्रचंड आहे. मालिकेत राणा व पाठकबाई यांची प्रेमापासून लग्नापर्यंतची गोष्टी पाहायला मिळाली. पडद्यावर या दोघांच्या जोडीला खूप प्रेम मिळालं. मात्र ऑफस्क्रीनसुद्धा यांची जोडी चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेली अभिनेत्री अक्षया देवधर हिने नुकताच हार्दिकसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

सध्या इन्स्टा रिल व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड वेड आहे. मग यात पाठकबाई व राणासुद्धा मागे राहिले नाहीत. हार्दिकसोबत अक्षयाने एक रिल व्हिडीओ शूट केला असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतोय. या व्हिडीओत अक्षयाचा पारंपरिक साडीतला लूक पाहायला मिळतोय, तर हार्दिकच्या दाढीची स्टाइल पाहून नेटकऱ्यांनी त्यावरही कमेंट्स केले आहेत. व्हिडीओतील दोघांचा रोमँटिक अंदाज पाहून हे दोघं डेट करतायत की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.  

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत कोल्हापूरच्या गायकवाड कुटुंबाची गोष्ट सांगण्यात आली होती. यामध्ये रणविजय उर्फ राणादाची भूमिका हार्दिक जोशीने तर पाठकबाई उर्फ अंजलीची भूमिका अक्षया देवधरने साकारली होती. अक्षयाने २०११ साली शाळा या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. २०१६ मध्ये तिला 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून मोठा ब्रेक मिळाला. तब्बल चार वर्षे या मालिकेने लोकप्रियता टिकवून ठेवली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT