Kundara Johny Death: Esakal
मनोरंजन

Kundara Johny Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

Vaishali Patil

Kundara Johny Death: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपटांमध्ये खलनायकाची भुमिका साकारुन लोकप्रिय झालेले प्रसिद्ध अभिनेते कुंद्रा जॉनी यांचे निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी केरळमधील कोल्लम येथे एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यामुळे साऊथ सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

कुंद्रा जॉनी यांना मंगळवारी हृदविकाराचा झटका आला होती. त्यांना तात्काळ केरळ येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून त्यांचे चाहते आणि कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

1979 मध्ये त्यांनी नित्या वसंतमसोबत काम करत आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भुमिका साकारुन मल्याळम चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला.

किरीदम (Kireedam) चेनकोल (Chenkol), वाहकाई चक्रम (Vaazhkai Chakram) आणि नदीगन (Nadigan) या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्यांच्या भुमिकेचे खुप कौतुक करण्यात आले होते.

'15 ऑगस्ट', 'हॅलो', 'अवन चंदियुदे माकन', 'भार्गवचरितम मुन्नम खंडम', 'बलराम विरुद्ध थरदास', 'भारत चंद्रन आयपीएस', 'दादा साहेब', 'क्राइम फाइल' या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.

'थचिलेदथ चुंदन', 'समंतराम', 'वर्णप्पाकित', 'सागरम साक्षी' आणि 'अनावल मोथीराम' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय करुन लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाची खुप मोठी हानी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT