Albatya Galbatya marathi drama producer rahul bhandare cheated by contractor sunil mahajan in pune show sakal
मनोरंजन

Albatya Galbatya: नाट्य निर्माते राहुल भंडारे यांची फसवणूक! पुण्यातील प्रयोगात राडा..

नीलेश अडसूळ

Albatya Galbatya marathi natak: मराठी मनोरंजन विश्वातील आज अजरामर बालनाट्य म्हणजे रत्नाकर मतकरी लिखित 'अलबत्या गलबत्या'. गेली काही वर्ष अद्वैत थिएटर या नाट्य संस्थेकडून हे नाटक उदंड प्रतिसादात सुरू आहे.

या आधीही वैभव मांगलेने चेटकिनीची मुख्य भूमिका सोडली तेव्हा या नाटकाची चर्चा झाली होती. त्यानंतर अभिनेते नीलेश गोपनारायण ही भूमिका करत आहेत सध्या लहानग्या मुलांना शाळेला सुट्ट्या असल्याने या नाटकाचे दौरे जोरदार सुरू आहेत.

पण नुकत्याच पुण्यातील एका प्रयोगाला मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. या नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांची फसवणूक झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कंत्राटदाराने ही फसवणूक केल्याचा आरोप निर्माते राहुल भंडारे यांनी केला आहे.

(Albatya Galbatya marathi drama producer rahul bhandare cheated by contractor sunil mahajan in pune show)

झाले असे की, काल, शुक्रवार 21 एप्रिल रोजी यशवंत नाट्यमंदिर ,कोथरुड पुणे येथे अलबत्या गलबत्या नाटकचा प्रयोग दुपारी १२.३० वाजता होता. हा प्रयोग 'संवाद' पुणे या संस्थेने आयोजित केला होता. सुनील महाजन ,निकिता मोघे ,केतकी महाजन -बोरकर हे त्या प्रयोगाचे आयोजक असून त्यांनी कांट्रॅक्ट शो घेतला होता.

पण ऐनवेळी हे आयोजक प्रयोग सोडून निघून गेले असा आरोप राहुल भंडारे यांनी केला आहे. भंडारे म्हणतात, ''या प्रयोगाच्या बदल्यात त्या आयोजकांनी एक रुपयाही एडव्हांस हा अद्वैत थिएटर ह्या आमच्या संस्थेला दिला नव्हता. फसवणुक करुन नाटकाची बदनामी करने तसेच नाटकाचे ठरलेल मानधन द्यायचे नव्हते ह्या हेतुने जाणूनबुजून सुनील महाजन यांनी हा डाव रचला होता .कलाकार ,टेक्निकल टीम वेळेत होते. काही तांत्रिक अडचणीमुळे नाटकाचा टेम्पो वेळेत येऊ शकला नव्हता म्हणून प्रयोग सुरु १.१५ ला होणार होता.''

''पण शो मधे ठरलेल्या अटी नुसार सुनील महाजन ह्यानी कसलीही व्यवस्था केली नव्हती .रसिक प्रेक्षकांना नाटक पाहायचे असताना जबरदस्ती त्यांना शो होणार नाही पैसे न्या असे सांगून निर्माते राहुल भंडारे हयांची परवानगी न घेता शो कॅन्सल केला.''

पुढे ते म्हणतात, ''हे जेव्हा कलाकारांच्या लक्षात आले आणि प्रेक्षक जेव्हा कलाकारांना बोलू लागले, आम्ही थांबू शकतो शो करा.. तेव्हाही सुनील महाजन आणि त्यांचे जावई बोरकर व मुलगी कलाकारांशी आणि प्रेक्षकांशी बेशिस्त पणे बोलत होते. पण प्रेक्षकांनी सुनील महाजन यांना चोख उत्तर देत हा शो करायला कलाकार आणि अलबत्या गलबत्याच्या टीमला सहकार्य केल. प्रेक्षकांचे प्रेम पाहून निर्माते राहुल भंडारे आणि सूत्रधार सुनील पानकर ह्यानी हा शो विनामूल्य प्रेक्षकांसाठी केला.'' अशी पोस्ट राहुल भंडारे यांनी शेयर केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT