Alia Bhatt at Met Gala 2023 News: फॅशन आणि ग्लॅमरचा वर्षातील सर्वात मोठा फॅशन इव्हेंट, Met Gala 2023 न्यूयॉर्क शहरात झाला. मेट गाला सुरू झाला आहे आणि सेलिब्रिटींचे एकापेक्षा जास्त लूक समोर आले आहेत. या शोचे बरेच व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
या वर्षी बॉलिवूड दिवा आलिया भट्टने मेट गालाच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले. मेट गालाच्या रेड कार्पेटवर आलिया खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी आलियाने पांढऱ्या मोत्याचा गाऊन परिधान केला होता यात ती राजकुमारीपेक्षा कमी दिसत नव्हती.
आलिया भट्टने मेट गाला 2023 मध्ये पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये तिचा हा पहिलाच रॅम्प वॉक होता. यावेळी आलियाने मेड इन इंडिया गाऊन परिधान केला होता. सोशल मीडियावर 'गंगूबाई'च्या या लूकची बरीच चर्चा झाली होती. मात्र, जेव्हा ती रॅम्पवर पोहोचली तेव्हा न्यूयॉर्क शहरातील मीडियाने तिला ऐश्वर्या राय बच्चन समजले.
आलिया भट्टचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती रेड कार्पेटवर फोटोग्राफर्सना पोज देताना दिसत आहे. तिनं यात डिझायनरसह एंन्ट्री केली होती. या व्हिडिओमध्ये काही पापाराझी आलियाला ऐश्वर्या राय बच्चन म्हणून हाक मारताना दिसत आहेत. मात्र, आलियाने परिस्थिती हाताळली आणि हसत हसत कॅमेऱ्यासमोर पोजही दिली.
आता या व्हिडिओला युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहे. त्यात एक प्रतिक्रिया अशी आहे की, ज्यावेळी हॉलिवूडस्टार भारतात आले होते त्यावेळी इथल्या पापाराझींनी त्यांच्या नावाची चेष्टा केली होती. जसं जेंडियाला जेंड्या आणि टॉम हॉलंडला टॉम्या असं अनेक नाव घेत त्यांनी खिल्ली उडवली होती. तर काहींनी याला आलियासाठी कौतुकास्पद सांगितले आहे की तिची तुलना विश्वसुंदरी ऐश्वर्यासोबत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.