Alia Bhatt Latest News अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडत आहे. चित्रपटाने कमाईने बॉलिवूड चित्रपटांचा दुष्काळ संपवला आहे. रणबीर कपूर व आलिया भट्टच्या चित्रपटाने देशभरात जवळपास ३०० कोटींची कमाई केली आहे. जगभरातून लोक या चित्रपटावर प्रतिक्रिया देत आहेत. दुसरीकडे आलिया भट्टने (Alia Bhatt) चित्रपटाच्या पुनरावलोकनाबाबत (रिव्ह्यू) मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.
ब्रह्मास्त्र हा ब्लॉकबस्टर चित्रपट मानला जात आहे. चित्रपटाच्या आकड्यांबाबतही वेगळीच चर्चा सुरू आहे. ही वेगळी बाब आहे. लोक चित्रपटाबद्दल खूप बोलत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे रिव्ह्यू देत आहेत. आलिया भट्ट विषयीही बोलले जात आहे. तिचे पात्र आणि संवादावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. याचे मिम्सही चांगलेच व्हायरल होत आहे.
हे सर्व सुरू असताना अभिनेत्री आलिया भट्टने चित्रपटाच्या पुनरावलोकनाबाबत (Review) मत व्यक्त केले आहे. ‘चित्रपटाचे कोणतेही पुनरावलोकन वाचत नाही. पहिल्या किंवा शेवटच्या दिवशी काय झाले हे जाणून घेणे आवडत नाही’ अशी आलिया भट्ट (Alia Bhatt) म्हणाली. हे जाणून तुम्हाला आर्श्चय होईल. मात्र, एका मुलाखतीत तिने हे म्हटले आहे.
पुनरावलोकन वाचून काहीही फायदा नाही
पुनरावलोकन वाचून काहीही फायदा नाही. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची विचारसरणी असते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो हिट होणार की नाही हे चर्चांवरून कळते. मी पुनरावलोकन वाचत नाही. चित्रपटाबद्दल काही चांगले बोलले गेले असतानाही. वाईट म्हटले तरी वाचत नाही, अशी आलिया भट्ट म्हणाली.
मी भेटून चित्रपटाचा फीडबॅक घेते
माझ्या पहिल्याच चित्रपटापासून मला सामान्यपणे जाणवते की माझा चित्रपट चालेल की नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला ते जाणवले. मी खूप लोकांना भेटते आणि विचारते. मी भेटून चित्रपटाचा फीडबॅक घेते की, त्यांना काय वाटते. मला वाचायचे नाही असे नाही, अशी आलिया भट्ट म्हणाली.
करणला रिव्ह्यू वाचायला आवडतात
करण जोहरला चित्रपटांचे पुनरावलोकन वाचायला आवडतात. चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे, असे त्यांना वाटते. कारण, जर कोणी समीक्षा लिहिली तर त्याचा अर्थ तो आपले प्रामाणिक मत देत आहे, असे करणचे मत असल्याचे आलिया भट्ट म्हणाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.