69 राष्ट्रीय पुरस्कार 2023च्या पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. ज्यात आलिया भट्ट, क्रिती सॅनन, अल्लू अर्जुन, आर माधवन, विकी कौशल या कलाकारांनी बाजी मारली.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणुन 'सरदार उधम' तर आर माधवनचा 'रॉकेटरी द नंबी इफेक्ट्स' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार हा आलिया भट्ट आणि क्रिती सेनन यांनी मिळवला. मात्र यावेळी बोलबाला झाला तो सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या नावाचा.
साउथ स्टार 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने हा पुरस्कार मिळवत नवा इतिहास रचला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा तो पहिला तेलगू अभिनेता ठरला आहे. या खास क्षणी मनोरंजन विश्वातल्या सर्वच कलाकारांनी या विजेत्या अभिनेत्यांचे कौतुक करत अभिनंदनचा वर्षाव केला आहे. तर क्रिती सेनन आलिया आणि अल्लू अर्जूनच्या घरी देखील जल्लोष करण्यात आला.
ज्युरींचे आभार मानत क्रितीनं राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. त्यात ती म्हणते की, तिला अजूनही विश्वास बसत नाहीये, मिमीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार तिला मिळाला आहे. यासाठी तिने ज्युरींचे आभार.
डिनो तसेच चित्रपटाच्या टिमचेही तिने आभार मानले. त्याचबरोबर तिच्या कुटूंबासाठी तिने लिहिले की, 'मम्मी, नुपूर, पापा, तुम्ही माझी लाईफलाईन आहात. नेहमी माझे चीअरलीडर बनल्याबद्दल धन्यवाद.'
तर आलियाने पोस्ट शेयर केली ज्यात तिने गंगूबाईची आयकॉनिक पोजमधील फोटो शेयर केला. या पोस्टमध्ये तिने संजय लीला भन्साळी, त्यांची टीम आणि संपूर्ण कुटुंबाचे आभार मानले.
तिला जोवर जमेल तोपर्यंत ती सर्वांचे मनोरंजन करेल असं म्हणत तिने क्रिती सेननचे देखील अभिनंदन केले. तिच्या अभिनयाचं कौतुकही केलं.
तर दुसरीकडे इतिहास रचणाऱ्या अल्लू अर्जूनच्या घरी तर जल्लोषाचे वातावरण होते. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. अल्लू अरविंदचे वडील अल्लू अरविंद यांनी या खास प्रसंगी आपल्या मुलाला मिठी मारली. याशिवाय चित्रपटाचा दिग्दर्शक सुकुमारही त्याच्या सोबत दिसत आहे. पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याच्या आनंदात अल्लूने आपल्या मुलांसह कुटुंबासह केक कापला.
काश्मीर फाइल्सच्या नर्गिस दत्त यांनाही पुरस्कार मिळाला आहे. यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हा व्हिडिओ शेअर करत हा पुरस्कार काश्मिरी पंडितांना समर्पित करत असल्याचे सांगितले. तर सिद्धार्थ मल्होत्रानेही शेरशाहला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पोस्ट शेयर करत सर्वांनाचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.