Ameesha Patel Blames Salman Khan For Yeh Hai Jalwa Getting Flop Recalls Hit And Run Esakal
मनोरंजन

Ameesha Patel: 'सलमानच्या 'हिट अ‍ॅण्ड रन' केसमुळे माझं..', आमिषाचा धक्कादायक खुलासा

Vaishali Patil

Ameesha Patel Blames Salman Khan: सध्या मनोरंजन विश्वात दोन सिनेमे धुमाकूळ घातला आहे. त्यात एक आहे 'गदर2' आणि दुसरा आहे 'OMG2'. गदर2 च्या माध्यमातुन सनी देओल आणि आमिषा पटेल यांनी बऱ्याच वर्षानंतर मोठ्या पडद्यावर एंट्री केली आहे.

दोघांची जोडी देखील प्रेक्षकांना खुप आवडत आहे. दरम्यान अमिषाने या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अनेक मुलाखती दिल्या आहेत. याच एका मुलाखतीत तिने तिच्या फ्लॉप चित्रपटाबाबत सलमान खानला जबाबदार धरले आहे.

(Latest Marathi News)

तब्बल दोन दशकांनंतर आमिषाचा गदर 2 चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. अमीषाने तिच्या करिअरच्या सुरुवातीला दोन सुपरहिट चित्रपट दिले, पण नंतर तिच्यावर फ्लॉप चित्रपटांचा शिक्का लागला.

दरम्यान ती एका मुलाखतीत तिच्या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या 'ये है जलवा' या फ्लॉप चित्रपटाबद्दल बोलली. या चित्रपटात तिच्या सोबत बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाची स्टोरी जरी चांगली असली तरी हा सिनेमा काही खास कमाल करु शकला नाही.

याबद्दल बोलतांना अमीषा पटेल म्हणाली की, डेव्हिड धवनच्या दिग्दर्शनात झालेल्या या चित्रपटात सर्व काही हिट झालं होतं मात्र त्यावेळी सलमान खानच्या 'हिट-अँड-रन' प्रकरणाच्या मीडिया कव्हरेजने या चित्रपटाच्या कामगिरीवर वाईट परिणाम झाला आणि चित्रपट खराब झाला.

अमीषा म्हणते, "ये है जलवा हा डेव्हिड धवनच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. सलमान खुपच देखणा दिसत होता. चित्रपटाचे संगीत आणि सर्व काही चांगले होते. पण मला वाटतं मीडिया रिपोर्ट्सचा प्रभाव होता.

इतकच नाही तर प्रेक्षकांना आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दल अशा बातम्या ऐकायलाही आवडत नव्हत्या. तेव्हाच सलमानचा अपघात झाला. यामुळेच 'ये है जलवा' बाजूला पडला. प्रेक्षक तो सिनेमा पाहायला गेले असते तर...हा एक चांगली कमाई करणारा चित्रपट ठरला असता."

'ये है जलवा' 3 जुलै 2002 रोजी रिलीज झाला होता. मात्र सलमान खानसाठी ते वर्ष खुपच खराब होतं. 28 सप्टेंबरला सलमानचे हिट अँड रन प्रकरण घडले. त्याची कार मुंबईतील एका बेकरीमध्ये घुसली.

याप्रकरणी सलमानला अटक करण्यात आली होती. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले होते. 2015 मध्ये या प्रकरणी ट्रायल कोर्टाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र,नंतर मुंबई उच्च न्यायालयाने तो आदेश रद्द केला. याचाच परिणाम त्या चित्रपटावर झाला.

यासर्व प्रकरणाचा परिणाम सलमान आणि आमिषाच्या 'ये है जलवा' सिनेमावर झाला आणि सिनेमा फ्लॉप झाला. हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर आमिषाचे बरेच चित्रपट फ्लॉप होऊ लागले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner LIVE Updates: गुलिगत धोकाने करून दाखवलं! सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता

Viral: 'मला तुरुंगात पाठवा, माझ्याकडे...', व्यापारी GST कार्यालयात गेला, अधिकाऱ्यांसमोरच अर्धनग्न होत छेडलं आंदोलन, कारण काय?

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नराधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT