Warrant Against Actress Ameesha Patel  Instagram
मनोरंजन

Ameesha Patel: अमिषा पटेलला होऊ शकते अटक..फसवणूकीच्या केसमध्ये कोर्टानं जारी केलं वॉरंट..जाणून घ्या प्रकरण

2018 साली 'गदर 2' अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यावर 'फॅमिली ऑफ ठाकुरगंज' चा निर्माता अजय सिंगनं ही केस दाखल केली होती.

प्रणाली मोरे

Ameesha Patel: बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या विरोधात फसवूण केल्याप्रकरणी कोर्टानं वॉरंट जारी केलं आहे. रांची येथील सिव्हिल कोर्टानं अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनर कुणाल याला चेक बाऊंस प्रकरणात हे वॉरंट जारी केलं आहे.

माहितीसाठी इथं नमूद करतो की हे प्रकरण अडीच करोडची फसवणूक केल्या संबंधित आहे. 2018 साली 'गदर' अभिनेत्री अमिषा पटेल वर 'फॅमिली ऑफ ठाकुरगंज' चा निर्माता अजय सिंगनं ही केस केली होती. त्यानं आरोप केला होता की अमिषा पटेलनं म्युझिक व्हिडीओ बनवू असं सांगून पैसे घेतले होते पण ना म्युझिक व्हिडीओ बनला ना निर्मात्याचे पैसे अमिषा पटेलनं परत दिले.

इंडिया टुडे रिपोर्टनुसार, आता रांचीच्या कोर्टानं अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात वॉरंट जारी केलं आहे. सोबत कोर्टानं नाराजगी जाहीर करत म्हटलं की अभिनेत्रीच्या विरोधात समन्स देखील जारी कले आहे पण असं असताना ना अमिषा कोर्टासमोर हजर झाली ना तिचा वकील.

या प्रकरणात आता पुढील सुनावणी 15 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.(Warrant Against Actress Ameesha Patel)

निर्माता आणि तक्रारकर्ता अजय सिंग यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यानं अमिषा पटेलसोबत अॅग्रीमेंट केलं होतं. या अॅग्रीमेंटमध्ये नमूद केल्यानुसार एका म्युझिक व्हिडीओवर काम होणार होतं.

याच्यात स्पष्ट लिहिलं होतं की अमिषाला हे पैसे जून 2018 पर्यंत व्याजासकट परत करायचे आहेत. पुन्हा पुन्हा अभिनेत्रीकडे पैशासाठी विचारणा केल्यानंतर अमिषानं अडीच कोटींचा चेक निर्मात्याला दिला होता. जो बाऊन्स झाला.

तसंच, अजय सिंगन अमिषा पटेल हिचा बिझनेस पार्टनर कुणाल गूमर याच्यावर धमकावण्याचा आरोप देखील केला आहे.

सध्या अमिषा पटेल तिच्या 'गदर 2' सिनेमामुळे चर्चेत आहे. ती पुन्हा एकदा सनी देओलच्या 'गरदर 2' सिनेमात त्याची सकिना म्हणून दिसणार आहे. सिनेमाचं प्रमोशन एकदम जोरदार सुरू झालं आहे. प्रमोशनसाठी स्टार्सनी आतापासून कंबर कसली आहे. यावर्षीच सिनेमा रिलीज होणार आहे,या सिनेमाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT