'अमेरिकन ग्राफिटी'मधील आपल्या उत्कृष्ट अभिनयानं त्यांनी लोकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती.
आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी जगभरात ओळखले जाणारे अमेरिकन अभिनेते (American Actors) बीओ हॉपकिन्स (BO Hopkins Passes Away) यांचं निधन झालंय. या अभिनेत्यानं वयाच्या 80 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय. 'अमेरिकन ग्राफिटी'मधील आपल्या उत्कृष्ट अभिनयानं त्यांनी लोकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या मृत्यूची माहिती अभिनेत्याच्या अधिकृत वेबसाइटद्वारे प्रसिद्ध करण्यात आलीय.
अभिनेता बीओ हॉपकिन्स यांच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध करताना असं लिहिलंय की, 'अत्यंत दु:खानं आणि जड अंत:करणानं हे जाहीर केलं जात आहे की, आज अभिनेता बीओ हॉपकिन्स आपल्यात नाहीयत.' सन 1969 ते 1979 दरम्यान अनेक प्रमुख स्टुडिओ चित्रपटांमध्ये प्रमुख सहाय्यक भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉपकिन्स यांनी 1969 च्या वेस्टर्न 'द वाइल्ड बंच'मधील 'क्रेझी ली'मधून वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांमध्ये सुरुवात केली.
त्यानंतर त्यांना दिग्दर्शक सॅम पेकिनपाह यांनी 'द गेटवे' (1972) या चित्रपटात संधी दिली. हॉपकिन्सनं यानंतर 'व्हाइट लाइटनिंग' (1973), 'पोसे' (1975), 'द मॅन हू लव्हड कॅट डान्सिंग' (1973), 'मिडनाईट एक्सप्रेस' (1978), 'अमेरिकन ग्राफिटी' (1973), 'द बाउंटी हंटर' (1989) या सारख्या डझनभर चित्रपटांमध्ये काम केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.