Sushant Singh Rajput | Sushant Moon Day Google
मनोरंजन

Sushant Singh Rajput: अमेरिकेत साजरा होणार 'सुशांत मून डे'!

अमेरिेकेच्या आंतरराष्ट्रीय लूना सोसायटीनं ही महत्त्वाची घोषणा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर केलीय.

प्रणाली मोरे

बॉलीवूडमध्ये खूप कमी काळात चांगल्या सिनेमांच्या माध्यमातून नाव कमावणाऱ्या सुशांत सिग राजपूतचं(Sushant SIngh Rajput) अचानक जाणं त्याच्या असंख्य चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेलं. अद्याप सुशांतनं आत्महत्या केली की त्याची हत्या झाली यावरनं गौडबंगाल सुरूच आहे. त्याच्या मृत्यूचं राजकारण झालेलं सगळ्यांनीच पाहिलं असेल. असो,त्याला प्रत्यक्षात न्याय मिळेल तेव्हा मिळेल पण त्याच्या जाण्यानंतर एक चांगली गोष्ट त्याच्या बाबतीत घडली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर दोन वर्षांनी त्याच्याविषयीची चांगली बातमी कानावर येत आहे. अर्थात त्याचे चाहते अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या आठवणी शेअर करत असतातच. पण आता अमरिकेतनं त्याच्याविषयी एक चांगली बातमी कानावर येत आहे. काय घडलंय नेमकं? चला जाणून घेऊया.

अमेरिेकेच्या 'आंतरराष्ट्रीय लूना सोसायटी'(America's International Luna Society)नं सुशांत सिंग राजपूतच्या जन्मतिथीचं एका खास अंदाजात स्मरण करण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याचं समजत आहे. सुशांत सिंगचा जन्मदिन हा २१ जानेवारी असतो. आंतरराष्ट्रीय लूना सोसायटी सुशांत सिंग राजपूतचा जन्मदिवस हा 'सुशांत मून डे' नावानं यापुढे साजरा करणार आहेत. लूना सोसायटीनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी सुशांतचा ३७ वा जन्मदिवस आहे. आतंरराष्ट्रीय लूना सोसायटीनं सांगितलं की,'' पुढच्या वर्षी सुशांतचा जन्मदिवस २१ जानेवारी हा 'सुशांत मून डे' म्हणून साजरा केला जाईल''. यावर्षी सुशांतचा जन्मदिवस त्याच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी 'सुशांत मंथ' असे नाव त्या सेलिब्रेशनला दिले होते.

सुशांत सिंग राजपूतला केवळ अभिनयात नाही तर अंतराळातील गोष्टींविषयी ज्ञान आकलन करण्यातही विशेष रस होता. त्याला अनेक गोष्टी त्या संदर्भात करायच्या होत्या. आकाशातले तारे पाहणं त्याला आवडायचं. त्यासाठी खास लाखो रुपये खर्च करून त्यानं त्याच्या घरात टेलीस्कोप बसवून घेतला होता. त्याला अंतराळाविषयी माहिती देणारं संग्रहालयही भविष्यात स्थापन करायचं होतं. इतकंच काय तर 'चंदा मामा दूर के' या सिनेमात तो मध्यवर्ती भूमिका साकारणार होता. या सिनेमाचं कथानक अंतराळाशी संबंधित गोष्टींशी निगडीत होतं.

हा सिनेमा सुशांतच्या अत्यंत जवळचा होता. या सिनेमाच्या तयारीसाठी सुशांत 'नासा'ला देखील भेट देऊन आला होता. सुशांत सिंग राजपूतची आठवण म्हणून या सिनेमाची निर्मिती करून तो प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्माते संजय पूरन सिंग यांनी घेतला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सिनेमा २०२४ साली सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. हा सिनेमा सुशांतला आपण समर्पित करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT