Seema Haider amit jani on Mns Warning seema-Haider sachin meena movie film shooting continues viral  Esakal
मनोरंजन

Amit Jani On MNS: अशा धमक्यांना मी घाबरत नाही! सीमा सचिनवर चित्रपट बनवणाऱ्या अमित जानींचा मनसेवर पलटवार..

Vaishali Patil

Amit Jani On MNS: सचिनच्या प्रेमात पडून चार मुलांसह पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर सतत्याने चर्चेत आहे. सीमा आणि सचिनची प्रेमकथा इतकी गाजली की त्यावर अमित जानी यांनी त्यावर 'कराची टू नोएडा' नावाचा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.

इतकच नाही तर अमित जानी यांनी सीमाला चित्रपटाची ऑफर दिली आहे. तेव्हापासून अमित जानी यांना सतत धमक्या येत आहेत. सपा नेत्याने त्यानंतर आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील अमित जानीला इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत लिहिलं होत की, "पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या.

आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय."

आता त्याच्या या ट्विटला दिग्दर्शक अमित जानी याने उत्तर दिले आहे. अमित जानीने त्याच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेयर करत मनसेला इशारा दिला आहे.

यात ते म्हणाले की, चित्रपट निर्माता 'कराची टू नोएडा' चित्रपट बनवल्यास ते निर्मात्याला मारतील. अशी धमकी त्यांनी दिली आहे. चित्रपट निर्मात्यांना धमकावणं, त्यांच्याकडून वसुली करणं हे मनसेच काम आहे. मी मनसेच्या हल्ल्याच्या धमकीला अजिबात घाबरत नाही.

पुढे निर्माता म्हणतोय की, "अमित जानी 19 तारखेला मुंबईत येणार. तुम्ही अमित जानीला थांबवु शकत नाही. उत्तर प्रदेश-बिहारचे प्रोड्युसर, अभिनेते आणि प्रोडक्शन हाऊस या चित्रपटाची निर्मिती या करत असल्याने मनसेला वाईट वाटले आहे."

"आम्ही मुंबईत येणार तिथेच चित्रपटाचं शुटिंग करणार आणि सर्व चित्रपटाची तयारी मुंबईतच करणार आहे. तुम्हाला जो राडा करणार याला अमित जानी घाबरत नाही" असं म्हणतं अमित जानी यांनी या व्हिडिओत मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर बरिच टिका केली आहे. त्याच्या या व्हिडिओची सध्या सोशल मिडियावर चर्चा सुरु झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT