Kaun Banega Crorepati News ‘मी मोठा, तू लहान’ यावरून अनेकदा वाद होतो. यासाठी मोठा संघर्षही पाहायला मिळतो. आशावेळी कोणी सोप्या भाषेत समजावून सांगितलं तर सोपे जाते. कारण, सोप्या आणि लहान गोष्टी सर्वांत मोठा धडा देतो. हाच प्रयोग अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी लोकप्रिय गेम शो कौन बनेगा करोडपतीमध्ये (Kaun Banega Crorepati) केला. याचा व्हिडिओ आयएएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे. व्हिडिओ इतका प्रेरणादायी आहे की, सर्वांवर खोल प्रभाव टाकतो.
आयएएस (IAS) अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमध्ये (Kaun Banega Crorepati) गोष्ट सांगताना दिसत आहे. मोठे हृदय आणि परोपकाराची व्याख्या कशी केली जाते याबद्दल अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सांगताना दिसत आहे.
अमिताभ बच्चन एक गोष्ट सांगतात. नंबर ९ ने नंबर ८ ला थापड मारली. नंबर ८ थापड मारण्याचे कारण विचारतो. तेव्हा नंबर ९ मी तुझ्यापेक्षा मोठा आहे असे सांगतो. यानंतर नंबर ८ हा नंबर सातला, सात हा सहाला असे एक नंबरपर्यंत मारत जातात. यामुळे भयभीत झालेला शून्य आपल्यालाही थापड मारली जाईल या भीतीने कोपऱ्याच जाऊन बसतो. मात्र, नंबर एक शून्याला थापड मारत नाही.
नंबर एक शून्याला थापड का मारत नाही हे माहीत करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ (Viral Video) बघा. हा व्हिडिओ सात लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहे. अमिताभ बच्चन यांची गोष्ट खोल संदेश देते. दिग्गज अभिनेत्याने गोष्ट चांगल्याप्रकारे मांडली असे युजर म्हणत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.