Amitabh Bachchan goes barefoot to Siddhivinayak temple  Esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan: माझ्या लेकराचा घुमर घुमू दे रे बाप्पा! अमिताभ बच्चन पोहचले सिद्धिविनायकाच्या दर्शनाला...

Vaishali Patil

Amitabh Bachchan goes barefoot to Siddhivinayak temple: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. 'कौन बनेगा करोडपती'च्या 15 व्या सीझन सुरू झाला आहे. सध्या बिग बी त्या शोमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ते चर्चेत आहेत.

त्यातच आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा बिग बींची चर्चा सुरु झाली आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन सिद्धिविनायकाच्या मंदिरात विना चप्पल पोहचले आहेत.

त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा 'घूमर' हा चित्रपट 18 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनदेखील छोट्या भुमिकेत दिसणार आहे.

गुरुवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात ते पोहोचले. यावेळी त्याच्यासोबत आणखी काही लोक देखील होते त्यासोबतच त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीसही त्यांच्या सोबत होते. अनवाणी अमिताभ बच्चन बराच वेळ चालले आणि नंतर मंदिरात दाखल झाले. यावेळी अमिताभ बच्चन कुर्ता पायजमा आणि शालमध्ये दिसले.

अमिताभ बच्चन हे खुपच धार्मिक आहेत. त्यांचा धर्मावर खूप विश्वास आहे. ते बऱ्याच वेळा ट्विटरवर देव-देवतांचे फोटो शेअर करत असतात. बऱ्याच दिवसांनी अमिताभ बच्चन सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. आता त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

18 ऑगस्टला अभिषेक बच्चनचा घूमर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याने आता या चित्रपटाच्या यशासाठीच अमिताभ सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले आणि त्यांनी गणपतीचे दर्शन घेतल्याच्या चर्चा आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ते शेवटचे ‘ऊंचाई’ या चित्रपटात दिसले होते. बिग बींनी आता त्यांचा बहुप्रतिक्षित क्विझ शो कौन बनेगा करोडपती सुरू केला आहे. सध्या ते या कार्यक्रमाचे शुटिंग करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT