Amitabh bachchan lands in legal trouble CAIT filed complaint 
मनोरंजन

Amitabh Bachchan : बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.

युगंधर ताजणे

Amitabh bachchan lands in legal trouble CAIT filed complaint : बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी मोबाईल कंपनीची केलेली जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी अमिताभ यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

फ्लिपकार्टचा बिग बिलियन सेल सुरु होणार आहे. त्या सेलच्या जाहिरातीही समोर आल्या आहेत. त्या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसिडर अमिताभ यांचीही एक जाहिरात ग्राहकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यात त्यांनी त्या कंपनीच्या वेगवेगळ्या ऑफर्सविषयी सांगितले आहे. मात्र बिग बी यांनी ती एक गोष्ट सांगून अनेकांची नाराजी ओढावून घेतली आहे.

Also Read - Penny Stocks : जादा नफ्याच्या मृगजळामागं धावणं नकोच!

या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुकानावर मिळणाऱ्या नाहीत. असे वाक्य अमिताभ यांच्या तोंडी होते. त्याच ओळीनं त्यांना मोठ्या संकटात टाकले आहे. त्यांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीमध्ये असे म्हटले गेले आहे की, अमिताभ यांनी जनतेशी खोटं बोलले आहेत. त्यांच्या मनात भ्रम तयार केला आहे. यासगळ्यावरून अमिताभ यांच्या जाहिरातीवरुन वाद झाला आहे.

अमिताभ यांनी संबंधित कंपनीच्या ऑफर्सची जाहिरात करताना त्या ऑफर्सविषयी सांगितलेली गोष्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावर सीएआयटी (कॉन्फीडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) ने बिग बीं च्या विरोधात सीसीपीए (सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथरिटी) ने खोटी माहिती दिल्या प्रकरणी तक्रार दिली आहे.

CAIT ने म्हटले आहे की, बिग बी यांनी केलेली ती जाहिरात ही देशातील छोट्या व्यापाऱ्यांच्या विरोधातील आहे. त्यामुळे ती जाहिरात मागे घेण्याची मागणी कंपनीकडे करण्यात आली आहे. अभिनेत्यानं ऑफलाईन दुकानदारांचा अपमान केला आहे. याचिकाकर्त्यांनी उपभोक्ता संरक्षण अधिनियमच्या अनुसार फ्लिपकार्टला शिक्षा आणि बिग बी यांनी दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा.असेही म्हटले आहे. यासंबंधीचे अधिक माहिती देणारे वृत्त आज तकनं दिले आहे.

CAIT चे महासचिव प्रविण खंडेलवाल यांनी सीसीपीए मध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, कलम २(४७) नुसार फ्लिपकार्टनं अमिताभ बच्चन यांच्या माध्यमातून मोबाईल किमतीबाबत ग्राहकांची फसवणूक केली आहे. त्या जाहिरातीमध्ये त्यांनी म्हटले होते की, फ्लिपकार्ट ज्या किंमतीला मोबाईल उपलब्ध करुन देते ती किंमत ऑफलाईन दुकानदार देऊ शकणार नाहीत. याचा परिणाम दुकानदारांवर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT