कोरोनाच्या कठीण काळात अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. कोणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या तर कोणी आर्थिक मदत केली. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांनी दिल्लीतल्या रकब गंज गुरुद्वारामधील कोव्हिड केअर सेंटरसाठी Covid Care दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष मंजिंदर सिंग सिरसा यांनी याबाबतची माहिती दिली. (Amitabh Bachchan Gave 2 Crore rupees For Covid Centre Delhi Gurdwara Body)
'शिखांच्या सेवेला सलाम, असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी श्री गुरूतेग बहादूर कोव्हिड केअर फॅसिलिटीसाठी दोन कोटी रुपये दिले. ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना दिल्ली करत असताना, बिग बींनी दररोज मला कॉल करून सुविधांबद्दलची विचारपूस केली', अशी पोस्ट सिरसा यांनी लिहिली.
रकब गंज गुरुद्वारामधील कोव्हिड सेंटर सोमवारपासून सुरू होत आहे. या सेंटरमध्ये ३०० बेंड्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, डॉक्टर्स, अॅम्ब्युलन्स इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. कोरोना रुग्णांसाठी या सर्व सुविधा मोफत असतील.
रविवार बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारताची मदत करण्याची विनंती केली. 'माझा देश भारत हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. एक नागरिक म्हणून मी जगाला विनंती करतोय की त्यांनी भारताची मदत करावी', असं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.