Amitabh Bachchan hand surgery! Announcement of upcoming project with Akshay - Surya SAKAL
मनोरंजन

Amitabh Bachchan: बिग बींच्या हाताची सर्जरी! अक्षय - सूर्यासोबत आगामी प्रोजेक्टची घोषणा

अमिताभ बच्चन यांनी पोस्ट शेअर करत खास बातमी दिलीय

Devendra Jadhav

Amitabh Bachchan - Akshay Kumar - Suriya News: बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन हे वयाची ८० ओलांडली तरीही विविध प्रोजेक्टमधून लोकांचं मनोरंजन करत असतात. अमिताभ यांनी नुकतंच KBC 15 चं होस्टींग केलं.

आता अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठी बातमी समोर येतेय. अमिताभ यांनी त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याचा उल्लेख केलाय. याशिवाय अक्षय कुमार - सूर्यासोबतचा फोटो पोस्ट करुन त्यांनी आगामी प्रोजेक्टची घोषणा केलीय.

(Amitabh Bachchan hand surgery! Announcement of upcoming project with Akshay kumar - Suriya)

अमिताभ यांनी आपल्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला आहे. झालं असं की.. अमिताभ यांनी नुकतंच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) च्या जाहिरातीचे फोटो पोस्ट केले आहेत.

अक्षय आणि साऊथ अभिनेता सूर्यासोबत अमिताभ शूटींग करत आहेत. बिग बींनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये अमिताभ अक्षय कुमारसोबत दोन सीन्सच्या मधल्या वेळेत हाताच्या शस्त्रक्रियेवर चर्चा करताना दिसत आहेत.

हाताच्या शस्त्रक्रियेबाबत बिग बींनी फारशी माहिती दिलेली नाही. मात्र फोटोंमध्ये त्यांच्या हातांवर बँड दिसून येतोय. या फोटोंमध्ये बिग बी दाक्षिणात्य कलाकार सूर्या आणि अक्षय कुमारसोबत दिसत आहेत. हे फोटो ISPL च्या अॅड शूट दरम्यान काढण्यात आले आहेत.

समोर आलेल्या फोटोंमध्ये अमिताभ - अक्षय - सूर्या हे तिन्ही कलाकार काळ्या कपड्यात दिसत आहेत. या फोटोंमध्ये तिन्ही स्टार्स खूपच हँडसम दिसत आहेत. काळ्या जॅकेटसह निळ्या जीन्समध्ये अक्षय कुमार खूपच देखणा दिसतोय.

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अमिताभ अक्षय कुमार आणि सूर्याला काहीतरी समजावताना दिसत आहेत. तर एका फोटोत ते अक्षयसोबत त्यांच्या हाताच्या शस्त्रक्रियेबद्दल चर्चा करत आहे.

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि सूर्या यांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. याशिवाय चाहते बिग बींच्या हाताच्या शस्त्रक्रियेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Burger: बर्गरमधून विषाणूचा प्रसार; ४९ जणांना बाधा, एकाचा मृत्यू, १० राज्यांमध्ये फैलाव

Maharashtra Assembly Election 2024 : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना संधी दिलेली नाही, फिल्टर लावूनच उमेदवारांची निवड - जयंत पाटील

Mohol Assembly Election : निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार यशवंत यांनी माने यांनी दाखल केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT