Amitabh Bachchan And Archana Puran Singh's Controversial Cover Shoot  Esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan Affair Fact Check: खरंच अर्चना पुरणसिंह अन् बिग बी यांचं अफेअर होतं का? 'या' कारणामुळे पसरलेली अफवा!

Vaishali Patil

Amitabh Bachchan And Archana Puran Singh's Controversial Cover Shoot: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या शो मुळे. मात्र यासोबत बिग बी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तितकेच चर्तेत असतात.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे अफेअर हे चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेले अफेअर होते. मात्र एक काळ असा होता की बिग बी हे रेखासोबतच्या नात्यामुळे नव्हे तर अर्चना पूरन सिंगसोबतच्या अफेयरच्या बातम्यांमुळे चर्चेत आले होते. अमिताभ बच्चन यांचे अर्चना पूरन सिंगसोबत खरोखर अफेअर होते का? असा प्रश्न आजही अनेकांना पडतो.

वास्तविक, 1992 मध्ये एका फिल्म मॅगझिनच्या कव्हर पेजवर एक फोटो प्रसिद्ध झाला होता. ज्याने सर्वत्र खळबळ उडाली. हा फोटो होता अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरण सिंह यांचा. त्यात हे दोघेही डेट करत असल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॅगझिनमध्ये अमिताभ आणि अर्चना यांच्या फोटोसोबत 'Amitabh and Archana Caught Red Handed in Love Nest.' असं टायटल देण्यात आलं होतं. त्यापुर्वीही अमिताभ बच्चन यांचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते.

मात्र अमिताभ बच्चन हे अर्चनाला डेट करत असल्याची बातमी लोकांना काय खरी पटेना. मात्र त्या फोटोमुळे अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना तसेच मित्रांनाही मोठा धक्का बसला होता. मात्र या फोटोमागे काही वेगळीच स्टोरी होती. खर तर या फोटोत अमिताभ बच्चन नसून त्यांच्यासारखा दिसणारा विजय सक्सेना नावाचा व्यक्ती होता. त्या मॅगझिनने आपल्या वाचकांना एप्रिल फूल बनविले होते.


मात्र जेव्हा अमिताभ आणि अर्चनाच्या अफेयरची बातमी पसरली तेव्हा मात्र बिग बी हे काहीच बोलले नाही. त्यांना याबद्दल कल्पना होती.

मात्र अमिताभ यांना सांगण्यात आले की मासिकात या बातमीच्या खाली हा फक्त एक प्रँक आहे जो एप्रिल फूलच्या दिवशी करण्यात आला आहे असं लिहिणार होते. मात्र मॅगझिनने बातमी प्रकाशित केली पण याचा उल्लेख केला नाही ज्यामुळे अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरण सिंग यांच्या अफेअरच्या बातम्या सर्वत्र पसरल्या. मात्र प्रत्यक्षात त्यात काहीच तथ्य नव्हतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT