Amitabh bachchan: सध्या बॉलीवूडच्या प्रत्येक सिनेमाला बॉयकॉट(Boycott) करण्याचा ट्रेन्ड(Trend) सुरू आहे. सेलिब्रिटींच्या जुन्या चुका,वादग्रस्त विधानं खोदून काढत लोक त्यांच्यावर ताशेरे ओढतानाचा सरळ त्यांच्या सिनेमावरच घाला घालताना दिसत आहेत. याचाच मोठा परिणाम झालेला आपण पाहिला तो 'लाल सिंग चड्ढा' सिनेमावर. आमिरचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या सिनेमाची बॉक्सऑफिसवर अक्षरशः माती झाली. सोबत अक्षयच्या 'रक्षाबंधन' सिनेमाचीही काही वेगळी अवस्था नव्हती. त्यानंही सिनेमातून लोकांच्या भावना दुखावल्याचं म्हणत त्यालाही धारेवर धरलं गेलं अन् 'बॉयकॉट रक्षाबंधन'चा नारा लगावला गेला.त्यानंतर त्या दोघांना बॉलीवूडमधून पाठिंबा देण्यासाठी जे-जे बोलले त्या सगळ्यांना बॉयकॉटची अक्षरशः धमकी दिल्याचंही आपण पाहिलं असेल.(Amitabh bachchan On Boycott Trend, Tweet Viral)
काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमध्ये 'लाइगर' सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण करणाऱ्या विजय देवरकोंडांने 'लाल सिंग चड्ढा'ला पाठिंबा देण्यासाठी बॉयकॉट ट्रेन्डच्या विरोधात आवाज उठवला तर ट्वीटरवर 'बॉयकॉट लाइगर'चा ट्रेन्ड सुरु झाला. तिकडे आलिया भट्टनं बॉयकॉट ट्रेन्डवर राग काढत म्हटलं की,'माझे सिनेमे आवडत नसतील तर नका पाहू' तर तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' विरोधात सूर निघू लागला. अनुराग,तापसी पन्नूचा 'दोबारा'ही बॉयकॉट ट्रेन्डवर त्यांच्या उर्मट बोलण्याने लोकांच्या रागाला सामोरं गेला आहे. हे असं सगळं सुरु असताना अमिताभ बच्चन यांचे बॉयकॉट ट्रेन्डवरील एक सूचक ट्वीट चर्चेत आले आहे. काय म्हणालेत अमिताभ? चला जाणून घेऊया..
अमिताभ बच्चन यांनी ट्वीटर अकाऊंटवर जे लिहिलं आहे, ते वाचल्यावर लगेच लक्षात येतं की त्यांनी बॉयकॉट या शब्दाचा ट्वीटमध्ये कुठेही उल्लेख न करता ते करणाऱ्यांवर व्यवस्थित आपल्या स्टाईलमध्ये शाब्दिक मारा केला आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे की,''काहीतरी बोलायचं मन करत आहे,पण कसं बोलू,प्रत्येक गोष्टीचा तर आज वादग्रस्त मुद्दा बनून जातो''. थोडक्यात हे ट्वीट त्यांनी हिंदी भाषेत लिहिलं आहे. ते असं की,''कुछ बातें करने का मन करता है ; पर करें तो कैसे करें ; हर बात की तो आजकल बात बन जाती है !''
अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकानं लिहिलं आहे,'सर, जोपर्यंत तुमचा ब्रह्मास्त्र रिलीज होत नाही तोपर्यंत तुमच्या मनात जे आहे मनातच ठेवा,बोलू नका'. तर दुसऱ्या एकाने लिहिलं आहे,'प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची नसते. आपले विचार सगळ्यांनाचा आवडावेत हे गरजेचे नाही'.
काही दिवसांपूर्वी जेव्हा आमिर खान 'कौन बनेगा करोडपती १४' या शो मध्ये गेला होता तेव्हा खरंत ट्वीटरवर 'लाल सिंग चड्ढा' विरोधात बायकॉट ट्रेन्ड सुरू झाला होता. त्यामुळे नंतर ट्वीटरवर 'बॉयकॉट कौन बनेगा करोडपती' हा ट्रेन्ड देखील सुरू करण्यात आला,का तर आमिर त्या शो मध्ये गेला. काही दिवस आधी तर 'बॉयकॉट ब्रह्मास्त्र' ट्रेन्ड देखील सुरु केला गेला होता. कारण आलिया एक विधान करुन बसली ज्यात तिनं लोकांना आपले सिनेमे पहायचे नसतील तर नका पाहू म्हटलं होतं. 'ब्रह्मास्त्र' मध्ये अमिताभ बच्चन,रणबीर कपूर,आलिया भट्ट, मौनी रॉय, नागार्जुन अक्कीनेनी असे कलाकार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.