Amitabh Bachchan Property, Net Worth Google
मनोरंजन

Amitabh Property: अमिताभचं मृत्यूपत्र, करोडोंची संपत्ती,घर,नेट वर्थ... जाणून घ्या याविषयी

50 हून अधिक वर्ष केवळ सिल्व्हर स्क्रीनवर नाही तर चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिलं जातं.

प्रणाली मोरे

Amitabh Bachchan Property: बॉलीवूडचा शहनशहा अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. गेल्या ५ दशकांपासून बिग बी मोठ्या पडद्यावरच नाही तर त्यांच्या चाहत्यांच्या मनावरही राज्य करत आहेत. अमिताभ यांचे पूर्ण नाव अमिताभ हरिवंशराय श्रीवास्तव बच्चन असे आहे. अमिताभ बच्चन यांची कमाई कधी काळी ५०० रुपये इतकी होती. पण आज पाहिलं तर करोडोंच्या संपत्तीचे ते मालक आहेत. आणि इतका पैसा कमावण्यामागे केवळ आणि केवळ त्यांचे कष्ट आहेत.

अमिताभ बच्चन आज ज्या ठिकाणी आहेत,तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. करिअरच्या सुरुवातीला त्यांना अनेक नकार पचवावे लागले. आपल्या ज्या दमदार आवाजाच्या बळावर अमिताभनी इतके वर्ष इंडस्ट्रीवर राज्य केलं त्याच आवाजाला कधी काळी रिजेक्ट केलं गेलं होतं. अमिताभ बच्चन यांना रिजेक्ट करताना त्यांचा आवाज किती वाईट आहे असं हिणवलं गेलं,तर कधी कुणी त्यांना त्यांच्या उंचीवरुनही टोकलं. एका निर्मात्याने अमिताभ बच्चन यांना पाहिल्यानंतर लगेचच तोंडावर नकार दिला होता. आणि त्यांच्या उंचीवरनं त्यांना चक्क 'उंट दिसतोयस' असं म्हटलं होतं.(Amitabh Bachchan Property, Net Worth)

अमिताभ बच्चन यांच्यासंदर्भात गूगलवर अनेक गोष्टी सर्च केल्या जातात. त्यात 'कौन बनेगा करोडपती'साठी ते एका एपिसोडचे किती घेतात?, एका जाहिरातीसाठी ते किती चार्ज करतात?,त्यांच्याकडे किती बंगले आहेत,त्यांनी मृत्यूपत्र केलंय का? आणि केलंय तर त्यात काय-काय आहे, हे असं सगळं शोधलं जातं. चला,आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही तुम्हाला अमिताभ यांच्याशी संबंधित सगळी माहिती देतो.

अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' च्या प्रत्येक सिझनमध्ये, प्रत्येक एपिसोडसाठी किमान ४ ते ५ करोड रुपये इतकं मानधन घेतात. रिपोर्ट्सनुसार कळत आहे की,'कौन बनेगा करोडपती'च्या सुरुवातीच्या काही सिझनसाठी अमिताभ यांनी एक ते दिड करोड मानधन घेतलं होतं. फक्त पहिल्या सिझनसाठी अमिताभ यांनी प्रत्येक एपिसोडसाठी २५ लाख रुपये घेतले होते.

गेल्या ५३ वर्षात अमिताभ बच्चन यांना सिनेमातून होणाऱ्या कमाईनं भरपूर फायदा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,७० ते ८० च्या दशकात अमिताभ एका सिनेमासाठी ५० हजार ते २० लाख रुपये चार्ज करायचे. पण आजच्या तारखेला अमिताभची हिच फी वाढत-वाढत प्रत्येक सिनेमासाठी ५ ते ८ करोड इतकी झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी म्हणे त्यांच्या 'आनंद' आणि 'चुपके,चुपके' सिनेमासाठी ५० हजार रुपये फी आकारली होती. तर 'डॉन'साठी त्यांनी अडीच लाख आणि 'मर्द','कुली' सिनेमासाठी प्रत्येकी ८ ते १० लाख चार्ज केले होते. अशाप्रकारे वर्षागणिक अमिताभ यांच्या मानधनात वाढ झालेली दिसून आली. 'खुदा गवाह' सिनेमासाठी ३० लाख रुपये तर 'पिंक' सिनेमासाठी ८ करोड आणि 'पा' साठी ४ करोड असे अमिताभ यांनी चार्ज केले होते. पण अमिताभनी काही असे सिनेमे देखील केले ज्यासाठी त्यांनी एक रुपयाही आकारला नाही. या सिनेमांमध्ये 'वीर झारा', 'सरकार','लक्ष्य' सारख्या सिनेमांचा समावेश आहे.

आज ८० व्या वर्षीही अमिताभ आपल्या शूटिंगमध्ये भलतेच व्यस्त पहायला मिळतात. एकापाठोपाठ एक सिनेमे ते साइन करताना दिसतात. आणि ते खरंच तरुणांचा उत्साह वाढवणारं चित्र आहे. २०२१ मध्ये अमिताभनी 'ब्रह्मास्त्र पार्ट १' केला,'चुप' आणि 'गूडबाय' मध्येही ते आहेत. हे सिनेमे नुकतेच रिलीज झाले. त्यांच्याकडे अजूनही ६ सिनेमे आहेत. ज्यात 'ऊंचाई','गणपत','घूमर','द उमेश क्रॉनिकल्स','प्रोजेक्ट k','बटरफ्लाय' अशा सिनेमांचा समावेश आहे.

या वयातही अमिताभ गुंतवणूकीला प्राधान्य देताना दिसतात. २०२१ मध्ये अमिताभनी ३१ करोड रुपयांचं घर खरेदी केलं. आणि सप्टेंबर २०२२ मध्ये मुंबईतील एका प्रथितयश विभागातील अपार्टमेंटमध्ये एक संपूर्ण मजला खरेदी केला. अमिताभ बच्चन यांनी हे घर चार बंगला विभागातील एका पॉश इमारतीत ३१ व्या मजल्यावर घेतले आहे. हे घर १२ हजार स्क्वेअर फीटचे आहे. अमिताभ आपल्या कुटुंबासोबत जलसा बंगल्यावरच राहतात. पण अरबोंची संपत्ती त्यांच्या नावावर आहे. एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, २०२२ मध्ये अमिताभ बच्चन यांची नेट वर्थ कमाई ३१९० करोड इतकी होती, ते वर्षाला ६० करोड कमावतात.

अमिताभ यांनी २०१३ मध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्यांनी जुहू येथील आपल्या 'जलसा' बंगल्याच्या मागचा एक बंगला देखील खरेदी केला आहे. ज्याची किंमत ५० करोडहून अधिक आहे. अमिताभ बच्चन यांच्याजवळ एकू ५ बंगले आहेत,ज्यात प्रतिक्षा,जलसा,जनक, वत्स यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त इलाहाबाद येथे अमिताभ यांच्या पूर्वजांचे मोठे घर आहे. आणि या सगळ्या प्रॉपर्टीमुळे अमिताभ हे बॉलीवूडमधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कलाकारांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.

अमिताभ बच्चन यांच्याकडे लक्झरी कार देखील आहेत. त्यात लेक्सस, रोल्स रॉयस,बीएमडब्ल्यू,मर्सिडीज सारख्या गाड्यांचा समावेश आहे. अमिताभ ब्रॅन्ड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतात. रिपोर्ट्सनुसार, एका जाहिरातीसाठी अमिताभ ५ करोड चार्ज करतात. अमिताभ रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करतात. त्यांनी अमेरिकेतील काही कंपन्यांव्यतिरिक्त क्लाउड कम्पयुटिंगसोबतही फायद्याचं डील केलं आहे.

अमिताभनी आपलं म्हणे मृत्यूपत्रही तयार केलं आहे. अमिताभ पहिल्यापासनंच मुलगी आणि मुलगा यात कधीच भेदभाव करत आले नाहीत. ते नेहमीच मुलींचं शिक्षण आणि समान हक्क यावर बोलत आले आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात आपण आपली संपत्ती मुलाला आणि मुलीला समान विभागून दिली आहे असं म्हणाले होते.

एवढंच नाही तर 'कौन बनेगा करोडपती'च्या एका एपिसोडमध्ये ते म्हणाले होते, ''माझ्या निधनानंतर माझी सर्व संपत्ती माझा मुलगा अभिषेक आणि मुलगी श्वेता यांच्यात समान विभागली जाईल''. २०१९ मध्ये जया बच्चन यांनी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी जेव्हा एफिडेव्हिट दाखल केलं होतं, त्यानुसार त्यांची आणि अमिताभची मिळून संपूर्ण संपत्ती ही जवळपास एक हजार करोडच्या आसपास होती. याव्यतिरिक्त अमिताभ आणि जया यांची मिळून एक लक्झरी प्रॉपर्टी आहे,जी ३४,१७५ स्क्वेअर फीट मध्ये पसरलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT