Amitabh Bachchan Says used to climb wall to watch girls next to his school,kaun banega crorepati 14 Google
मनोरंजन

KBC:'मुलींना चोरुन पाहण्यासाठी मी...' किस्से रंगवून सांगणं फक्त अमिताभनाच जमतं

KBC 14 सिझन सुरू झाला आहे आणि दिवसागणिक स्वतः अमिताभ देखील स्पर्धकांसोबत आपल्या आयुष्याविषयी नवनवीन खुलासे करताना दिसत आहेत.

प्रणाली मोरे

Kaun Banega Crorepati 14: केबीसी मध्ये दर दिवशी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नवनवीन खुलासे करताना दिसत आहेत. कंटेस्टंटसोबत अमिताभ देखील आपल्या आयुष्याशी जोडले गेलेले अनेक रंजक किस्से शेअर करताना दिसत आहेत. 'कौन बनेगा करोडपती'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये बिग बी यांनी काही अशा गोष्टी शेअर केल्या आहेत ज्या ऐकल्यावर आपल्यालाही आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल. अमिताभ यांनी सांगितलं आहे की त्यांची शाळा सुटल्यावर ते बाजू्च्या शाळेतील मुलींना पहायला जायचे.(Amitabh Bachchan Says used to climb wall to watch girls next to his school,kaun banega crorepati 14)

केबीसीच्या गेल्या एका एपिसोडमध्ये सोमेश्वर सपकाळ हे स्पर्धक खूप चांगला खेळ खेळताना दिसले. त्यांनी ४० हजार रुपये जिंकले होते. आणि पुढे ८० हजाराच्या प्रश्नावर त्यांची गाडी थांबली. ज्यानंतर त्यांनी ऑडियन्स पोल लाइफलाइनचा वापर केला. यानंतर सोमेश्वर यांनी १ लाख ६० हजारच्या प्रश्नावर आपल्या दोन लाइफलाइनचा वापर केला होता. ३ लाख २० हजार च्या प्रश्नावर सोमेश्वर पुन्हा अडखळले. पण त्यांच्याकडे कोणतीही लाइफलाईन तेव्हा शिल्लक राहिली नव्हती.

सोमेश्वर यांनी खूप विचार करून रिस्क घेतली आणि एक उत्तर दिलं, पण ते चुकीचं निघालं. आणि त्यांना खेळ सोडावा लागला. त्यानंतर फास्टर्स फिंगर्स फर्स्ट च्या प्रश्नांमध्ये सगळ्यात फास्ट उत्तर नोंदवून नैनीतालचे प्रशांत शर्मा हॉट सीटवर बसले. प्रशांत यांनी हजारचा टप्पा ओलांडल्यानंतर बिग बी त्यांच्याशी गप्पा मारायला लागले. तेव्हा त्यांनी सांगितलं की लहान असताना दुसऱ्या शाळेतील मुलींना पाहण्यासाठी ते भिंतीवर उडी मारुन चढायचे अन् मुलींना पाहायची कसरत करायचे.

स्पर्धक प्रशांत यांनी अमिताभ यांची छोटीशी एक मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत गप्पा मारताना अमिताभ यांनी आपल्याला काय खायला आवडतं हे शेअर केलं. प्रशांत यांनी बिग बी ना विचारलं तुम्हाला काय खायला आवडतं? नैनीतालच्या एका जुन्या हॉटेलचं नाव घेत प्रशांतनी बिग बी ना आपण तिथे कधी गेलायत का हे विचारलं. तेव्हा अमिताभ म्हणाले,''माझी कधी हिम्मतच झाली नाही. कारण तेव्हा एवढे पैसे माझ्याकडे नसायचे. आम्ही त्या हॉटेलच्या बाजूने निघून जायचो. कधीच लहर आली तर फक्त त्याच्या खिडकीतून आत वाकून पहायचो. आणि डोळ्यांनीच पदार्थांचा आनंद घ्यायचो''.

त्यानंतर बिग बी यांनी सांगितलं की त्यावेळी एका चपातीसोबत एक भजी खायला दिली जायची एका हॉटेलात. बटाट्याची भाजी देखील चपातीत रोल करून मिळायची. तसं खाण्यात वेगळीच मजा होती. त्यासाठी आम्ही भिंतीवर उडी मारुन जायचो. कारण आमच्या शेरवूड कॉलेजच्या रस्त्याला लागूनच ते हॉटेल होतं. आणि भींतीवरनं उडी मारुन पलिकडे जाणं आमच्यासाठी काहा फार कठीण नव्हतं. कारण आमच्या शाळेच्या शेजारी लागूनच मुलींची शाळा होती, आणि तेव्हा आम्ही चोरून मुलींना पाहण्यासाठी भींतीवर उडी मारुन चढायचो.

अमिताभ बच्चन यांचा हा किस्सा ऐकून शो मध्ये उपस्थित सगळेच हसायला लागले. अमिताभ शो मध्ये असे किस्से ऐकवतच असतात. आणि शो मध्ये रंगत आणत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT