सोशल मीडियावर या सिनेमासंदर्भात माहिती देणारी पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांच्या 'चेहरे' सिनेमाच्या निर्मात्यानं आपल्या या नवीन निर्मिती विषयी सांगताना म्हटलं आहे,''सिनेमाची वन लाईन स्टोरी ऐकल्यानंतर अमिताभ लगेच तयार झाले हा सिनेमा करण्यासाठी. हा सिनेमा माझ्यावर असलेल्या विश्वासाच्या आधारावर त्यांनी स्विकारला आहे. ते या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच गुजराती सिनेमातून काम करणार आहेत''.( Amitabh Bachchan to make his Gujarati film debut)
''सुरुवातीला त्यांनी सिनेमासाठी 'हो' म्हटल्यानंतर माझ्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता. मी एकदा माझ्या या सिनेमासंदर्भात त्यांना भेटून बोललो होतो. आणि त्यांनी यामध्ये काम करावं अशी मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. ते एक सुपरस्टार आहेत. आणि मी त्यांना एका प्रादेशिक सिनेमात कॅमिओसाठी विचारत होतो,ज्याचं मानधनही मी काही मोठी रक्कम ऑफर केली नव्हती''.
''पण अमिताभ बच्चन यांनी कुठलेही आडेवेडे न घेता माझ्या गुजराती सिनेमात काम करण्यास हो म्हटलं. इतकंच नाही तर बिग बी यांनी हा सिनेमा कुठलही मानधन न स्विकारता करण्याचं ठरवलं असं देखील निर्माते पंडीत म्हणाले. फक्त आमच्यात असलेल्या चांगल्या नात्याच्या आधारावर अमिताभ सारख्या मोठ्या स्टारनं काहीही पैसे न घेता काम करण ही खूप मोठी गोष्ट आहे. इतकंच नाही,तर सिनेमातील छोट्यातल्या छोट्या गुजराती कलाकारासोबतही त्यांनी खूप मनमिळावूपणे काम केलं आहे. गुजराती भाषेत संवाद समजून घेणं देखील त्यांनी खूप मनापासून केलं आहे. या वयात इतका उत्साह,इतकी उर्जा असणारा अभिनेता कुठे पहायला मिळतो''.
पंडीत यांनी पुढे सांगितले की,''सिनेमासाठी डबिंगही अमिताभ यांनी स्वतःच्या आवाजात केलं आहे. खरंतर आम्ही त्यांना गुजराती व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देणार होतो,पण त्यासाठी ते तयार झाले नाहीत''. अमिताभ त्यावेळी पंडीत यांना म्हणाले,''आनंदजी,जे काम माझं आहे ते मीच करणार. तुम्ही माझं काम पहा,आवडलं नाही तर मग आपण व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट कडून करून घेऊ. आपल्या कलाकारावर विश्वास ठेवा,मी तुम्हाला निराश नाही करणार''.
याविषयी आणखी माहिती देताना निर्माते आनंद पंडीत म्हणाले,''असा अभिनेता मी पाहिला नाही. आपल्या कामाप्रती निष्ठा ठासून भरलेला. ते गुजराती भाषेचा लहेजा शिकले. आणि जास्तीत जास्त आपला संवाद कसा परफेक्ट होईल यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांचं वागणं,कामाप्रती प्रेम,कष्ट करण्याची तयारी पाहिली की आज ते इतके मोठे का आहेत याची प्रचिती येते''.
अमिताभ बच्चन यांचा 'फक्त महिलाओ माटे' हा सिनेमा १९ ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.