Amitabh Bachchan In 'Jhund' Google
मनोरंजन

Jhund: 'सर,रडून दाखवा'; सेटवर एका मुलानं अमिताभना केली होती विनंती

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' सिनेमात अमिताभ यांनी फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

प्रणाली मोरे

नागराज मंजुळे(Nagraj Manjule) दिग्दर्शित 'झुंड'(Jhund) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला समिक्षकांनी तर डोक्यावर उचलून धरलं,आता मायबाप प्रेक्षकांच्या कोर्टात सिनेमा पोहोचलाय तिथं किती या दर्जेदार कलाकृतीला न्याय मिळतोय हे आता पहायचं. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत तरी सिनेमानं सात कोटींपर्यंत बॉक्स ऑफिसवर मजल मारली होती. मराठी प्रेक्षकांसाठी नागराज मंजुळेचा सिनेमा, तर हिंदी आणि जागतिक पातळीवर अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे नाव पुरेस होतं 'झुंड' ची चर्चा होण्यासाठी. आता सिनेमाच्या प्रदर्शनानंतरही अनेक नव्या गोष्टींचा खुलासा होत आहे. नुकतंच अमिताभ यांनी सिनेमाच्या शूटिंगवेळचा एक किस्सा मुलाखतीमध्ये शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी 'झुंड' सिनेमात फूटबॉल प्रशिक्षकाची भूमिका केली आहे. झोपडपट्टीतील मुलांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणत त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याचं काम करणारा प्रशिक्षक अमिताभ यांनी रंगवला आहे. यावेळी त्यांच्यासोबत ज्या मुलांनी काम केलं आहे ती प्रत्यक्ष झोपडपट्टीत राहणारी मुलं होती. ज्यांनी कधीच अभिनय केला नव्हता. कधीच कॅमेऱ्यासमोर काम केलं नव्हतं. त्या सगळ्यांची ती पहिलीच वेळ होती. अर्थात नागराजच्या सिनेमांचा हाच खरा युएसपी असतो. अमिताभ यांनी ज्या विजय बारसे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे ते आज प्रत्यक्ष समाजात झोपडपट्टी फुटबॉल संघ संस्थांसाठी काम करत आहेत. महाराष्ट्रातच नाही तर भारतभरात त्यांनी अशा संस्थेची स्थापना केली आहे,ते केवळ झोपडपट्टीतील मुलांना योग्य मार्ग दाखवून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी.

अमिताभ यांनी याच मुलांसोबतचा शूटिंग दरम्यानचा एक अनुभव नुकताच शेअर केला आहे. ते म्हणाले,''शूटिंगदरम्यान त्या मुलांपैकी एकानं मला असा प्रश्न विचारला की तो ऐकून मी काही वेळापुरता निःशब्द झालो,काय बोलावं ते सुचेना. काय बरं विचारलं होतं अमिताभना त्या मुलाने?'झुंड' सिनेमात 'स्लम सॉकर' म्हणजे झोपडपट्टी फुटबॉल संघ आणि त्यासाठी गेली अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची सत्य कहाणी दाखवण्यात आली आहे. नागराजनं या सिनेमात ज्या झोपडपट्टीतील मुलांना अभिनयासाठी एकत्र आणलं होतं त्यांच्यासाठी एका खास वर्कशॉपचं आयोजन केलं होतं. हे वर्कशॉप शूटिंगला सुरुवात करण्याआधी घेण्यात आलं होतं.

अमिताभ यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की,''मला ती गोष्ट आजही लख्ख आठवतेय. एक सीन होता जिथे त्या मुलांच्या डोळ्यात अश्रू आहेत. ते रडत आहेत. त्या सीनआधी एक मुलगा माझ्याजवळ आला आणि मला विचारलं,'सर,रडतात कसं?' त्या वाक्यात खरतर खूप वेदना होती. ही मुलं रडण्यापलिकडं पोहोचलीय,जिथं वेदनाही निष्प्रभ झालीय. आणि ही अवस्था माझ्या अंगावर काटा आणून गेली. तो मुलगा त्याच्या आयुष्यात कधीच रडला नव्हता. कदाचित तो ज्या वातावणात राहतोय,वाढला आहे त्या आजुबाजूच्या परिस्थितीनं त्याला त्या रडण्यापलिकडच्या वेदनेपर्यंत नेऊन ठेवलं आहे. तो क्षण माझ्यासोबत आता कायम राहिलं''.

हा सिनेमा आणि अमिताभ यांनी साकारेली विजय बारसे ही व्यक्तिरेखा समिक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांच्याच मनाला भिडली आहे. अमिताभ यांनी या मुलाखतीत हे देखील आवर्जुन नमूद केलं की,''सिनेमात मी ज्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसोबत काम केलं त्या मुलांचा अभिनय खरंच कौतुकास्पद आहे. त्यांचा अभिनय खूप सहज होता. असं वाटत होतं ते आपलं प्रत्यक्ष जीवन पडद्यावर जगतायत''. नागराज मंजुळे दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्सऑफिसवर अद्याप हवी तशी पकड धरू शकला नसला तरी अजूनही अपेक्षा आहे की सिनेमा प्रेक्षकगण उचलून धरतील. सिनेमाचा विषय आणि सिनेमातील कलाकारांचा अभिनय दोन्ही दर्जेदार असल्यानं 'झुंड' सिनेमाला अपेक्षित यश मिळायला हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT