Amruta Fadnavis Viral Video esakal
मनोरंजन

Amruta Fadnavis Video : 'ज्यांनी मारले नाकर्तेपणावर बाण...'! अमृताजींनी उखाण्यातून विरोधकांचे टोचले कान

युगंधर ताजणे

Amruta Fadnavis Viral Video : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओची सध्या चर्चा आहे. त्यामध्ये त्यांनी उखाणा घेत विरोधकांवर केलेली टिप्पणी खूप काही सांगून जाणारी आहे. चाहते आणि नेटकऱ्यांनी त्या उखाण्याचे स्वागत केले आहे.

अमृताजी या कधी त्यांच्या गाण्यातून तर कधी इंस्टावरील रिल्समधून चाहत्यांच्या चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या अधिक आहे. यापूर्वीच्या त्यांच्या व्हायरल झालेल्या गाण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

नागपुरातून अमृताजींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यातून त्यांनी केलेली राजकीय टोलेबाजी ही राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे. अमृताजींचा तो उखाणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट देऊन त्यांचे कौतुक केले आहे.

अमृताजी आपल्या त्या उखाण्यात म्हणतात, ज्यांनी मारले नाकर्तेपणावर बाण, त्या देवेंद्रजींकडून मी घेऊन आले विकासाचे वाण, आता सगळ्यांनी स्विकारावे आहे एकत्र, आपण महाराष्ट्र करु निर्माण....त्यांच्या या उखाण्याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

यापूर्वी देखील अमृता फडणवीसांनी त्यांच्या भाषणातून विरोधी पक्षांवर कडाडून टीका केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या चर्चेतही आल्या होत्या. त्या वक्तव्याची महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही होती. या सगळ्यात त्यांच्या नव्या उखाण्यानं लक्ष वेधून घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adar Poonawalla: पुण्याच्या बॅटमॅनने 1,000 कोटींना विकत घेतले करण जोहरच्या 'धर्मा'चे 50 टक्के शेअर्स

Latest Maharashtra News Updates : मुंबादेवीचे माजी आमदार अतुल शाह फडणवीसांच्या भेटीला

Assembly Elections 2004 : 'या' पक्षाची उमेदवारी नरसिंगरावांनी स्वीकारली आणि फक्त 11 मतांनी ते विजयी झाले'

Diwali 2024 Gift Idea: दिवाळीत मित्र अन् नातेवाईकांना द्या अप्रतिम भेटवस्तू, 500 रुपयांपेक्षा कमी बजेटमधील गिफ्टची यादी वाचा एका क्लिकवर

ऋषी कपूर यांच्या अचानक निधनाने अशी झालेली कपूर कुटुंबाची अवस्था; लेक रिद्धिमा म्हणाली- तोंडावर दाखवत नसले तरी...

SCROLL FOR NEXT