amruta khanvilkar stands for folk artist patthe bapurav vithabai narayangaonkar and tamasha artist  sakal
मनोरंजन

'कधीतरी आमच्या आयुष्यात पण डोकवा' लोककलावंतासाठी अमृताने जोडले हात..

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने लोककलाकारांचा संघर्ष मांडत त्यांच्या मदतीसाठी हात जोडले आहेत.

नीलेश अडसूळ

Amruta khanvilkar : बहुचर्चित चंद्रमुखी सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं. या चित्रपटातील गाणीही विशेष गाजली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १ कोटींहून अधिकची कमाई केली. मराठी चित्रपट सृष्टीतील भव्य दिव्य प्रमोशन झालेला सिनेमा अशी याची ओळख बनली. चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे होऊनही चित्रपटाची किमया कमी झालेली नाही. दिवसेंदिवस हा चित्रपट अधिकच गाजतो आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर चंद्राच्या म्हणजे प्रमुख भूमिकेत होती. टायटल रोल मिळालेला हा अमृताचा (amruta khanvilkar) पहिला सिनेमा होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच तिने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली. या यशाचे सार्थक झाल्यांनतर अमृता नुकतेच तुळजाभवानीचे दर्शन घेतले. पण ज्या कलावंतीणीची भूमिका तिनं साकारली त्या लोककलावंतांसाठी आज तिने जनतेच्या दरबारात साकडं घातलं आहे.

लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर बेतलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रसाद ओक (prasad oak) याने दिग्दर्शित केला आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहेत. या चित्रपटात दौलत या मुख्य पात्राची भूमिका आदिनाथ कोठारे यांनी साकारली आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर आहे. या चित्रपटाची कथा काल्पनिक असली तरी एका तमाशा कलावंतीण असणाऱ्या चंद्राच्या जीवनावर तो आधारित आहे, त्याला सत्याची किनार आहे. या चित्रपटाच्या दरम्यान अमृताने स्वतः लोककलावंतांच्या जीवनाचा अभ्यास केला, त्यावेळी तिला या कलाकारांच्या जगण्यातला संघर्ष दिसला. म्हणून आज तिने या लोककलावंतासाठी लोकांपुढे हात जोडले आहे. (amruta khanvilkar stands for folk artist patthe bapurav vithabai narayangaonkar and tamasha artist)

अमृताने एक इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे, त्यात ती म्हणते, 'कदीतरी आमच्या औक्षात पन डोकवा जमलं तर.. दोन लाख लावण्य गीतं लिहिणारा आमचा कुबेर पट्ठे बापूराव म्हातारपणी गरिबीत मेला.. ९ महिन्याचं पोट घेऊन नाचणारी, मधीच पडद्या मागं जाऊन बाळाला जन्म देणारी आणि अडकित्यानं नाळ कापून पुन्हा मंचावर येऊन थाळी नाच करणारी आमची विठा बाई नारायणगावकर ह्यांच्या बद्दल लिहा की ओ कदीतरी.. येक कलावंतीण' अशी व्यथा तिनं मांडली आहे. (amruta khanvilkar instagram post)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT