Amruta Khanvilkar won best actress award in maharashtracha favourite kon  sakal
मनोरंजन

Amruta Khanvilkar: व्वा! अमृता खानविलकर ठरली महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री..

'चंद्रा'साठी अभिनेत्री अमृता खानविलकरला मिळाला हा बहुमान..

नीलेश अडसूळ

 Amruta Khanvilkar: गेल्या वर्षभरात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या मराठी सिनेमांची लोकप्रियता तर बॉक्स ऑफीससवरील कमाईत दिसलीच पण आता महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री कोण हे जाणून घेण्याची. अखेर हे नाव समोर आलं आहे.

(Amruta Khanvilkar won best actress award in maharashtracha favourite kon )

झी टॉकीज वाहिनीतर्फे १५ डिसेंबरला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्काराची नामांकने दणक्यात जाहीर झाली. यामध्ये महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री कोण या विभागात अभिनेत्री अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, हृता दुर्गुळे, रितिका श्रोत्री आणि वैदेही परशुरामी यांच्यात चांगलीच चुरस रंगली. अखेर हा बहुमान अमृताला मिळाला आणि ती ठरली महाराष्ट्राची फेवरेट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री..

हेही वाचा: मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

अमृता खानविलकर हिची चंद्रमुखी या सिनेमातील चंद्रा ही भूमिका महाराष्ट्राची फेव्हरेट कोण या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आली होती. लेखक विश्वास पाटील लिखित चंद्रमुखी या कादंबरीवर बेतलेल्या या सिनेमातील अमृताची भूमिका तिच्या आयुष्यातील माइलस्टोन ठरली.

आजपर्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसलेल्या अमृताने चंद्रमुखी ही व्यक्तीरेखा साकारत लावणी, तमासगीर कलावंतीणीचं आयुष्य, प्रेमासाठीची व्याकुळता दाखवण्यात सगळं कौशल्य पणाला लावलं. या सिनेमाने अमृताच्या अभिनय आणि नृत्यकलेचंही कौतुक झालं. त्यामुळे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब तिने पटकावला.  

  मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हा पुरस्कार सोहळा घेऊन यावर्षी पुन्हा एकदा झी टॉकीज ही वाहिनी रसिकांच्या भेटीला आली आहे. सिनेमा निर्मितीपासून सिनेमा प्रदर्शनापर्यंत आणि अनेक वैविध्यपूर्ण व प्रयोगशील कार्यक्रमाची नांदी सादर करणाऱ्या झी टॉकीज वाहिनीच्या पडदयावर काही दिवसांतच महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण पुरस्कार सोहळा प्रक्षेपित होणार आहे. नुकताच हा सोहळा चित्रित करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT