Amy Jackson Reacts To Being Trolled: बॉलीवूडपासून सुरुवात करत तामिळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री एमी जॅक्सन ही सध्या तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते.
त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलचं ट्रोल केले होते. तिचा हा नवा लूक चर्चेचा विषय ठरला होता. तिच्या या लूकमुळे लोकांनी तिच्यावर मीम्स बनवले इतकचं नाही तर तिची तुलना हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिलियन मर्फीशी करण्यात आली.
सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगनंतर आता एमीनं प्रतिक्रिया दिली आहे. सतत नकारात्मक प्रतिक्रिया आणि टीका झाल्यानंतर ती खूप दुःखी असल्याचं सांगितलं.
एमीनं नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लूकबद्दल आणि ट्रोलिंगबद्दल सांगितले. याबद्दल बोलतांना ती म्हणाली की , मी एक अभिनेत्री आहे आणि मी माझे काम खूप गांभीर्याने करते. गेल्या महिन्यापासून मी यूकेमध्ये एका नवीन प्रोजेक्टचे शूटिंग करत आहे. त्यामुळे यात तिची व्यक्तिरेखा जशी आहे त्यासाठी बारीक व्हावे लागले. आणि तिला स्वत:ला पूर्णपणे बदलावे लागले.
यात पुढे ती म्हणते की, भारतातील लोक करत असलेल्या ट्रोलिंगमुळे ती खुप दुःखी आहे. मी अशा अनेक मेल हिरोंसोबत काम केले आहे, ज्यांना त्यांच्या चित्रपटासाठी लूक बदलावा लागला आणि त्याचे खुप कौतुक झाले मात्र जर एखादी स्त्री काहीशी वेगळी हेअरस्टाईल आणि मेकअप करते तर ते तिच्या सौंदर्यासाठी चांगले दिसत नाही. अशावेळी त्या महिलेला ट्रोल करण्याचा आपल्याला हक्क आहे, असं लोकांना वाटतं.
तर दुसरीकडे तिच्या लूकची तुलना ही हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फीशी करण्यात आली त्यावर एमी म्हणते की, खूप आनंदी आहे. त्यानी स्वतः एक प्रकारे माझा सन्मान केला आहे.
एमीने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 2011 मध्ये प्रतीक बब्बरसोबत 'एक दिवाना था' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. यानंतर त्याने सिंग इज ब्लिंग आणि रजनीकांतसोबत २.० चित्रपटात काम केले. आता ती ‘अच्चम एनबधु इल्लाये’ या चित्रपटातून ती बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.