Ananya Panday trolled: बॉलीवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री अनन्या ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नेहमी ती असं काही तरी करते की तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मग तो तिचा लूक असो किंवा तिचा व्हिडिओ ती नेहमीच चर्चेत येते.
व्हायरल झाला आहे. ज्यात ती मोलभाव करतांना दिसत आहे. ज्यानंतर सोशल मिडियावर तिला पुन्हा ट्रोल करण्यात आल आहे.
त्याच झालं असं की अनन्यानं तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने केवळ बार्गेनिंगच नाही तर अवघ्या 1000 रुपयांमध्ये भरपूर खरेदीही केली आहे.
या व्हिडिओत ती सांगते की तिला एक टास्क देण्यात आला आहे. जिथे तिला जास्तीत जास्त वस्तू 100 रुपयांमध्ये खरेदी करायच्या आहेत.
व्हिडिओमध्ये दिसते की त्यासाठी अनन्या एका लोकल मार्केटमध्ये जाते आणि तिथे फॅशनशी संबंधित अनेक गोष्टी खरेदी करण्यास सुरुवात करते. त्यात तिने केसांच्या क्लिप, हँड बॅग आणि अनेक छोट्या वस्तू खरेदी केल्या आहेत. पण जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तेव्हा तिचं बजेट 1000 च्या वर जाते.
त्यानंतर अनन्याना तिचं बार्गेनिंग कौशल्य दाखवते. ती त्या दुकानदाराला त्या वस्तूची किंमत कमी करण्यासाठी सांगते. त्यानंतर बऱ्याच बार्गेनिंगनंतर सेल्फीचं लालच देवुन ती त्या दुकानदाराकडून त्या वस्तू खरेदी करते.
मात्र तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरवात केली.
लोकांनी कमेंट करत तिला सुनावले आहे. एकानं लिहिलयं की, जेव्हा मोठ्या मॉल्समध्ये जाते तेव्हा ती कोणतीही बार्गेनिंग करत नाही. तर दुसऱ्याने लिहिले की, ब्रँडेड कपडे परिधान केल्यावर कोणीही बार्गेनिंग करत नाही.
तर काहींनी ती गरीबांची खिल्ली उडवत असल्याचंही म्हटलं आहे. इतकच नाही तर अनन्यानं या व्हिडिओत इतकी अॅक्टिंग केली आहे की, नेटकऱ्यांनी तिला पुन्हा ओव्हर अॅक्टिंग होत आहे त्यामुळे जरा कमी कर असा सल्लाच दिला आहे.
अनन्या पांडेच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अभिनेत्री लवकरच विक्रमादित्य मोटवाने यांच्या सायबर क्राईम थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. ती फरहान अख्तरच्या 'खो गए हम कहाँ' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव सोबत दिसणार आहे.
सध्या अनन्या आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' च्या रिलीजच्या तयारीत आहे. हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. अनन्याही 'कॉल मी बे' मधून वेब सीरिजमध्ये पदार्पण करत आहे. हा शो Amazon Prime Video वर स्ट्रीम होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.