Ananya Pandey's advice on dealing with breakup Google
मनोरंजन

ब्रेकअप झालंय? वाचा अनन्या पांडेने दिलेल्या महत्त्वाच्या टीप्स..

अनन्या पांडेचं ईशान खट्टर सोबत ब्रेकअप झाल्याची बातमी भलतीच गाजली होती.

प्रणाली मोरे

सध्या अनन्या पांडे(Ananya Pandey) तिच्या आगामी 'लाइगर'(Liger) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये भलतीच बिझी आहे. सिनेमात अनन्या साउथस्टार विजय देवरकोंडा सोबत दिसणार आहे. या सिनेमाविषयी ती भलतीच उत्सुक आहे. 'लाइगर' प्रमोशन मध्ये व्यस्त असलेल्या अनन्याने चाहत्यांना ब्रेकअपमधून(Breakup) स्वतःला सहीसलामत बाहेर काढण्याच्या टीप्स(Advice) दिल्या आहेत. चला जाणून घेऊया अनन्याची ब्रेकअपशी डील करण्याची पद्धत नेमकी काय आहे.(Ananya Pandey's advice on dealing with breakup)

'खाली पीली' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांच्या डेटिंगच्या बातम्या समोर आल्या होत्या. अनन्या आणि ईशानला खूप ठिकाणी एकत्र स्पॉट केलं गेलं होतं. पण काही महिने आधीच ईशान आणि अनन्या यांच्या ब्रेकअपच्या हेडलाईन्सनी त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. अर्थात, अनन्या-ईशान दोघांपैकी कुणीच आपल्या रिलेशनवर कधी समोर येऊन बोललं नव्हतं. आता यानंतर काही महिन्यातच अनन्याने ब्रेकअप मधून बाहेर कसं यायचं याचे सल्ले दिले आहेत.

अनन्याचे म्हणणे आहे की जेव्हा तुमचं हार्टब्रेक होतं तेव्हा अरजीत सिंगची गाणी ऐका. त्याव्यतिरिक्त खूप आईस्क्रीम खा,जेणेकरुन मन हलकं होईल,आणि मनाला चांगलं वाटेल. अनन्या त्या मुलाखतीत पुढे म्हणाली, ''भावनांच्या मायाजाळात स्वतःला अधिककाळ गुंतवून न ठेवता त्यातून बाहेर येण्यावर माझा विश्वास आहे. आपल्या भावना मनातल्या मनात साठवून आपल्याला वाटतं आपण खूप स्ट्रॉंगपणे या सगळ्याशी डील करत आहोत. मला वाटतं त्यापेक्षा एकदाच खूप रडून घ्या,ते बेस्ट आहे. आणि रडताना अरजीतला नक्की ऐका. आईस्क्रीम खूप खा, एका दिवसांत तुम्ही ठीक व्हाल. मला वाटतं यावर सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. ब्रेकअपवर यापेक्षा बेस्ट उपाय आणखी दुसरा कुठला असूच शकत नाही''.

अनन्या पांडेचा 'लाइगर' सिनेमा २७ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. हिंदी,तामिळ,तेलुगु,कन्नड,मल्याळम भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे,जे चाहत्यांच्या अधिक पसंतीस उतरलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT