बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला(Salman Khan) काही दिवसांपू्र्वीच काळवीट शिकार प्रकरणात दिलासा मिळाला होता. सलमानच्या याचिकेवर निर्णय देताना राजस्थान हायकोर्टांनं (Rajasthan Highcourt) खालच्या कोर्टात सुरू असलेल्या सर्व केस प्रकरणात एकत्र निर्णय देण्यासाठी तयारी दर्शवली होती. पण आता सलमानच्या अडचणी आणखी वाढल्याचं दिसत आहे. ५ एप्रिलला त्याला मुंबईत अंधेरी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सलमानवर बऱ्याच केसेस सुरु आहेत. पण नक्की कोणत्या केस प्रकरणात त्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत? चला जाणून घेऊया सविस्तर. (Salman Khan news Updates)
अभिनेता सलमान खान आणि त्याच्या वाहन चालकाला ५ एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. माहितीनुसार कळत आहे की,कोर्टानं सलमानला आयपीसी सेक्शन ५०४ आणि ५०६ अंतर्गत करण्यात आलेल्या तक्रारीसाठी हे समन्स बजावले आहे. पत्रकार अशोक पांडेनं(Reporter Ashok Pande) सलमाननं त्याच्याशी केलेल्या कथित गैरवर्तन प्रकरणासाठी तक्रार दाखल केली होती. म्हणूनच अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टानं सलमानला नोटीस पाठवली आहे. पत्रकार अशोक पांडेशी गैरवर्तन केल्याचं प्रकरण २०१९ सालातलं आहे.
त्यावेळी सलमान सायकल राईड करीत असताना पत्रकार अशोक पांडे आणि त्याच्या कॅमेरामननं त्याचं शूटिंग करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सलमानला हे आवडले नव्हते. पत्रकारानं दाखल केलेल्या तक्रारीनुसार सलमान आणि त्याच्या ड्रायव्हरनं कथित मारहाण केली होती. काळवीट प्रकरणात नुकताच दिलासा मिळाला असला तरी आता पत्रकाराशी केलेलं गैरवर्तन प्रकरण सलमानला सहज दिलासा मिळवून देईल की आणखी अडचणी वाढवेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.