Andhra Pradesh CM congratulated the rrr team for winning the golden globe adnan sami got angry..read inside story Google
मनोरंजन

Adnan Sami:आंध्र प्रदेशच्या सीएमनी केलं गोल्डन ग्लोब मिळालेल्या RRR चं कौतूक..पण अदनान सामी भलताच उखडला

RRR सिनेमातील 'नाटू नाटू' गा्ण्याला गोल्डन ग्लोब मिळाल्यानंतर आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी टीमला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या होत्या.

प्रणाली मोरे

Adnan Sami: सध्या मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे ती एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटाची..या चित्रपटाने पुन्हा इतिहास रचला आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.

आयकॉनिक गोल्डन ग्लोब जिंकून भारताला अभिमान वाटला. आंतरराष्ट्रीय ट्रॉफी जिंकल्याबद्दल चित्रपटसृष्टीतूनच नाही तर अगदी राजकीय वर्तुळातूनही आरआरआर च्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मात्र, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विजयाबाबत केलेल्या ट्विटवरनं गायक अदनान सामीनं मात्र त्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.( Andhra Pradesh CM congratulated the rrr team for winning the golden globe adnan sami got angry..read inside story)

एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटातील नाटू नाटू' या ओरिजनल गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला तेव्हा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देताना आपले विचार ट्विटरवर मांडले आणि ट्विट केले.

"#तेलुगु ध्वज उंच फडकत आहे! सर्व #आंध्र प्रदेशच्या वतीने मी @mmkeeravaani, @ssrajamouli, @tarak9999, @AlwaysRamCharan आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. @RRRMovie चा. आम्हाला तुमचा अतुलनीय अभिमान आहे! #GoldenGlobes2023."

ट्विट केल्यानंतर लगेचच अदनानने ट्विट शेअर केले आणि 'तेलुगू ध्वज उंच फडकत आहे' असे म्हणत रेड्डींवर टीका केली. त्याच्या ट्विटरवर अदनानने लिहिले, "तेलुगु ध्वज? तुम्हाला भारतीय ध्वज म्हणायचे आहे बरोबर? आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि म्हणून कृपया स्वतःला देशापासून वेगळं करणं थांबवा... विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर, आपण एक देश आहोत! ही 'अलिप्ततावादी' वृत्ती अत्यंत हानिकारक आहे. जसे आम्ही 1947 मध्ये पाहिले होते! धन्यवाद...जय हिंद''.

अदनानच्या या ट्विटवरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एपीच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार एस राजीव कृष्णा यांनीही ट्विट केले की, ''अदनानने रेड्डी यांच्या ट्वीटचा चुकीचा अर्थ उगाचच काढला आहे. राजीव पुढे म्हणाले की, 'अदनानं त्यांना देशभक्ती शिकवण्याची गरज नाही''.

अदनानने त्यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आणि कलेतील योगदानाबद्दल दिवंगत दिग्गज पं रविशंकर आणि सत्यजित रे यांची उदाहरणे देखील दिली. देशाच्या एका विशिष्ट प्रदेशापेक्षा या व्यक्तिमत्त्वांनी भारताचा गौरव केला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपण भारतीय आहोत तर भारतीय ध्वज असा उल्लेख करणं योग्य राहिलं असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT