संदीप रेड्डी वांगाचा अॅनिमलवर लोकं जेवढं कौतुकाचा वर्षाव करत आहेत तेवढ्याच प्रमाणात त्याच्यावर टीकाही होत आहे. त्यातील काही सीन्स, डायलॉग आणि दृष्यं यामुळे नेटकऱ्यांनी मेकर्स आणि कलाकारांवर आगपाखड केली आहे. या सगळ्यात प्रसिद्ध अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतले आहे.
प्रेम चोप्रा यांनी अॅनिमलमध्ये महत्वाची भूमिका वठवली आहे. त्याचंही प्रेक्षकांनी, चाहत्यांनी कौतुक केलं आहे. एका मुलाखतीमध्ये प्रेम चोप्रा यांनी चित्रपटातील वेगवेगळे सीन्स यावर दिलखुलासपणे प्रतिक्रिया दिली आहे. अॅनिमलनं आता कमाईच्याबाबत आठशे कोटींपर्यंत आला आहे. रणबीर कपूरच्या आजोबांच्या भावाची भूमिका साकारली आहे. प्रचंड हिंसा, मारधाड आणि इंटिमेट सीन्स यामुळे हा चित्रपट चर्चेत आला होता.
सोशल मीडियावर अॅनिमलमधील त्या सीन्समुळे नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्यावर प्रेम चोप्रा म्हणतात की, काही निगेटिव्ह व्यक्तिरेखा यामुळे तर चित्रपटाची रंगत वाढते. त्यामुळे तो चित्रपट प्रेक्षकांना आवडतो. प्रेम चोप्रा यांनी ७० ते ८० च्या दशकांत साकारलेल्या निगेटिव्ह भूमिकांची नेहमीच चर्चा होत असते. पूर्वीच्या चित्रपटांमधील व्हिलनकडे फारसा स्कोप नव्हता. त्यांना एका ठराविक विषय अथवा हेतूपुरतेच स्क्रिनवर साकारले जायचे.
आताच्या चित्रपटांमधील निगेटिव्ह कॅरेक्टरकडे काही ना काही उद्देश आहे. त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची ठरते. पहिल्यांदा तर चित्रपटातील निगेटिव्ह रोल्सची भूमिका काय आहे हे देखील सांगितले जात नव्हते. आता ते फार ठळकपणे समोर येते. हे जास्त महत्वाचे आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते प्रेक्षकांना आवडते. असे प्रेम चोप्रा यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रेम चोप्रा यांनी १९७३ मध्ये आलेल्या बॉबी नावाच्या चित्रपटाचा दाखला दिला. त्याचे दिग्दर्शन राज कपूर यांनी केले होते. त्यात ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यावेळी चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका करणाऱ्यांवर वेगळ्या प्रकारचा ठपका ठेवला जायचा. त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारे पाहिले जात होते. मग तो कलाकार मी असो, अमरिश पूरी असो किंवा प्राण साहेब असोत.
त्या चित्रपटामध्ये रणबीर कपूर असा का आहे, तो एवढा हिंस्त्रपणे का वागतो याचे कारण त्याच्या वडिलांना गोळी मारण्यात आली आहे. त्यामुळे तो अस्वस्थ झाला आहे. त्याला काही झालं तरी बदला घ्यायचा आहे. या गोष्टी चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यासाठी फारच महत्वाच्या ठरतात. असेही प्रेम चोप्रा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.