Animal Movie Ranbir Kapoor Bollywood Actor esakal
मनोरंजन

Ranbir kapoor Animals : ८०० मास्क ४०० कोयते 'अ‍ॅनिमल' मधील तो फाईट सीन कसा शुट झाला माहितीये?

यंदाच्या वर्षी ज्या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा आहे ती त्या रणबीरच्या अॅनिमलची.

युगंधर ताजणे

Animal Movie Ranbir Kapoor Bollywood Actor : यंदाच्या वर्षी ज्या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा आहे ती त्या रणबीरच्या अॅनिमलची. संदीप रेड्डी वांगानं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट डिसेंबरच्या एक तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यत पोहचावा आणि त्यानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करावी यासाठी जोरदार प्रमोशन सुरु केले आहे.

रणबीर कपूर, अनिल कपूर, सुरेश ऑबेरॉय, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. वांगा हा त्याच्या आक्रमक आणि डार्क सिनेमासाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक आहे. आजवरच्या त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यात अर्जून रेड्डी, कबीर सिंग या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. अशात अॅनिमलनं नेटकऱ्यांचे, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध

ओल्ड बॉय या एका कोरियन चित्रपटातील हाणामारीच्या प्रसंगाची नक्कल अॅनिमलमध्ये केली गेली आहे अशा चर्चेला काही दिवसांपासून उधाण आले आहे. याशिवाय अक्षय कुमार, अमिताभ बच्चन आणि शेफाली शहा यांच्या जानवर चित्रपटातील अनेक प्रसंग आणि अॅनिमलमधील रणबीर कपूरच्या तोंडी असलेले संवाद यांच्यात साम्य असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडिय़ावर व्हायरल झाले आहे.

सध्या अॅनिमलमधील त्या कोयत्याच्या सीनची प्रचंड चर्चा आहे. मास्क घातलेली ती लोकं आणि त्यांना मारहाण करणारा रणबीर या दृष्यानं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. हा सीन शूट करण्यासाठी दिग्दर्शकाला प्रचंड मेहनत करावी लागली. असे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. आजतकनं यासंबंधीचे वृत्त दिले आहे. अॅनिमल प्रोजेक्टशी जोडल्या गेलेल्या त्या व्यक्तीनं सांगितलं की, या चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायलन्स आहे. तो दाखवण्यासाठी मोठे आव्हान होते.

कोयते, मास्कची आयडिया दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांची आहे. त्यांनी हा सीन शुट करताना खूपच मेहनत घेतली आहे. ते चित्रपट पाहिल्यावर कळून येईलच. तुम्ही आता ट्रेलरमध्ये जो कोयत्याचा सीन पाहता आहात त्यासाठी खूप सारे प्लॅनिंग करावे लागले होते. त्याचे क्रेडिट दिग्दर्शकाचे आहे.

त्या फायटिंग सीनसाठी तब्बल आठशे मास्क तयार केले गेले, आणि ते सगळे फायबर ग्लासचे तयार करण्यात आले आहे. त्याला खास पद्धतीनं कोटिंग करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये तब्बल वीस मिनिटांचा फाईट सीन आहे. आतापर्यत कोणत्याही चित्रपटात एवढ्या मोठ्या लांबीचा फाईट सीन नाही.

कोयत्याच्या साह्यानं झालेल्या त्या फाईटमध्ये १०० खरेखुरे कोयते बनवून घेण्यात आले.डमी म्हणून ४०० कुऱ्हाडी तयार करुन घेण्यात आले. हे सगळे रबर, थर्माकॉल, आर्यन आणि फायबरपासून तयार करण्यात आले होते. तो पूर्ण सेट करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला. अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT