Animal Pre Release Event Mahesh Babu fan jumps on stage and then Video goes viral SAKAL
मनोरंजन

Animal Pre Release Event: महेश बाबूच्या फॅनने स्टेजवर उडी मारली आणि मग.. व्हिडीओ व्हायरल

Devendra Jadhav

रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. अ‍ॅनिमल काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अ‍ॅनिमलमध्ये रणबीर, बॉबी देओल असे अनेक कलाकार आजवर कधीही न पाहिलेल्या अंदाजात बघायला मिळत आहेत.

अ‍ॅनिमलचा प्री रिलीज इव्हेंट नुकताच झाला. हैद्राबादमधील मल्ला रेड्डी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे हा खास इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंटमध्ये महेश बाबू,एस एस राजामौली असे दिग्गज उपस्थित होते. अशातच या इव्हेंटमध्ये एक फॅन धावत महेश बाबूला भेटायला आला. पुढे काय घडलं आम्ही तुम्हाला सांगतो.

(Animal Pre Release Event Mahesh Babu fan jumps on stage)

महेश बाबूला भेटण्यासाठी फॅनने स्टेजवर उडी मारली आणि...

झालं असं की, अ‍ॅनिमलचा प्री रिलीज इव्हेंट सुरु होता. यावेळी महेश बाबूच्या एका उत्साही चाहत्याने त्याला भेटण्यासाठी धावत थेट स्टेजवर उडी मारली. रश्मिका मंदानाने स्टेजवर आपले भाषण संपवताच फॅन लगेच महेश बाबूकडे धावला. तेथे उपस्थित सुरक्षारक्षकांनी घाईघाईने त्या चाहत्याला अभिनेत्यापासून दूर केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्टेजवर उपस्थित रणबीर आणि अनिल कपूरसुद्धा ही घटना पाहत राहिले

अ‍ॅनिमल सिनेमाचा रनटाईम आणि सेन्सॉर सर्टिफिकेट

रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर यांची प्रमुख भुमिका असलेल्या अ‍ॅनिमल सिनेमाचा लांबी खुप मोठी आहे. तब्बल ३ तास २१ मिनीटं लांबीचा हा सिनेमा असणार आहे. त्यामुळे सध्याच्या फास्ट जमान्यात प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा होणार, यात शंका नाही.

याशिवाय सेन्सॉरकडून सिनेमाला A सर्टिफिकेट मिळालंय. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा सिनेमा रोमान्स आणि अ‍ॅक्शनचा मसाला असणार यात शंका नाही.

या दिवशी अ‍ॅनिमल सिनेमा येणार भेटीला

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीजची निर्मिती असलेला अ‍ॅनिमल सिनेमाची सध्या खुप चर्चा आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट क्राईम ड्रामा प्रकारातील आहे. सिनेमात रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल अशा कलाकारांच्या प्रमुख भुमिका आहेत. हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 ला सिनेमागृहात रिलीज होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Seat Sharing: विधानसभेत रंगत! महाविकास आघाडीकडे मागितली स्वतंत्र लढण्याची परवानगी, कोणत्या पक्षाने केलं शक्ती प्रदर्शन?

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; देशांतर्गत शेअर बाजार कसा असेल?

Maharashtra Politics: निवडणुकीनंतर होणार प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ; सातवड यात्रेतील होईकाची भविष्यवाणी नेमकी काय?

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' बंद केली, शेतकरी सन्मान, पीएम आवासही थांबणार आहे का? माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल

Latest Maharashtra News Updates : कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT