Animal Worldwide Collection esakal
मनोरंजन

Animal Worldwide Collection: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' चा कहर, ८०० कोटींच्या जवळ गेला! बॉबीच्या करिअरमधला सर्वात हिट चित्रपट

रणबीरचा सर्वाधिक चर्चेतील चित्रपट म्हणून आता अॅनिमलचे नाव घेतले जात आहे.

युगंधर ताजणे

Animal Worldwide Collection : रणबीर कपूरच्या फिल्म करिअरमधील आतापर्यतचा सर्वात मोठी हिट चित्रपट म्हणून अॅनिमलचे नाव घ्यावे लागेल. या चित्रपटानं तुफान कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. दोन आठवड्यांमध्ये अॅनिमलनं प्रचंड कमाई करुन आपली ताकद दाखवून दिली आहे.

रणबीरचा सर्वाधिक चर्चेतील चित्रपट म्हणून आता अॅनिमलचे नाव घेतले जात आहे. अशातच या चित्रपटानं आठशे कोटींच्या कमाईच्या दिशेनं झेप घेतल्याचे बोलले जात आहे. त्याच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. येत्या काळात अॅनिमल वेगळ्याच विक्रमाला गवसणी घालेल असे बोलले जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार या चित्रपटानं आतापर्यत पूर्ण जगभरातून ७७२.३३ कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. आठशे कोटींचा टप्पा अॅनिमलनं केल्याचे बोलले जात आहे. येत्या आठवड्यात हा चित्रपट आणखी मोठी मजल मारेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रदर्शित झाल्यापासून अॅनिमलच्या वाट्याला तुफान प्रतिसाद मिळतो आहे.

यंदाच्या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अॅनिमलचेही नाव समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी किंग खानचा पठाण, जवान, त्यानंतर सनी देओलचा गदर २, रणवीर सिंगचा रॉकी और रानी की प्रेम कहानी सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. भलेही अॅनिमल या वर्षी शेवटच्या टप्प्यात प्रदर्शित झाला असला तरी त्यानं पूर्ण कसर भरुन काढल्याचे दिसून आले आहे.

भारतामध्ये अॅनिमलच्या वाट्याला तुफान लोकप्रियता आल्याचे दिसून आले आहे. एकट्या भारतातून हा चित्रपट पाचशे कोटीं क्लबच्या दिशेनं वेगानं झेप घेत आहे. वर्ल्ड वाईड कलेक्शनही तीनशे कोटींपेक्षा जास्त आहे. सॅकनिकच्या रिपोर्टनुसार १३ दिवसांत या चित्रपटानं ४६७. ८४ कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे.

फिल्मची मोठी स्टार कास्ट....

अॅनिमलच्या स्टारकास्ट विषयी बोलायचे झाल्यास त्यामध्ये रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, शक्ती कपूर, तृप्ती डिमरी, सौरभ सचदेव, प्रेम चोप्रा आणि सुरेश ऑबेरॉय यांच्या महत्वाच्या भूमिका आहे. संदीर रेड्डी वांगानं या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यानं यापूर्वी कबीर सिंग आणि अर्जून रेड्डी नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Fashion Tips For Assembly Election Result Celebration: तुमचा उमेदवार निवडून आलायं? सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, 'असा' करा हटके लुक

Women Health: PCOS वर नियंत्रण ठेवायचे असेल तर ही योगासने नियमित करा, होतील भरपूर फायदे

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT