animal movie shooting in saif ali khan pataudi palace  Esakal
मनोरंजन

Animal Song Arjan Vailly: अर्जन वैली आहे तरी कोण? अ‍ॅनिमल मधल्या गाण्याचं पंजाबच्या इतिहासाशी आहे कनेक्शन!

Vaishali Patil

Story Behind Animal Song Arjan Vailly:  रणबीर कपूरचा 'Animal' सध्या जगभरात चर्तेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील रणबीर कपूरच्या दमदार अभिनयाने सर्वांनाच थक्क केलं आहे.

या चित्रपटाला समिक्षकांना संमिश्र प्रतिसाद दिला असला तरी चाहत्यांनी मात्र अॅनिमलला डोक्यावर घेतलं आहे. त्यातील फाईट सीन्स आणि गाणी सर्वच चाहत्यांना खुप आवडत आहे.

या चित्रपटातील सर्वच गाणी प्रेक्षकांना खुप आवडत आहेत. त्यातच बी प्राकचं 'सारी दुनिया जला देंगे' हे गाणंही प्रेक्षकांना आवडले मात्र सर्वात जास्त चर्चा झाली आहे ती Arjan Vailly या गाण्याची.

रणबीर कपूरच्या Animal या चित्रपटातील 'Arjan Vailly' हे गाणे आजकाल प्रत्येकाच्या ओठावर आहे. चित्रपट पाहिल्यानंतर हे गाणे बऱ्याच वेळ डोक्यात फिरते. मात्र या गाण्याचा खरा अर्थ काय आहे?अर्जन वेल्ली कोण आहे? असे अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत. त्यामुळे आता अर्जन वैली यांचा इतिहास थोडक्यात जाणुन घेवूया.

कोण आहे अर्जन वैली?

अर्जन वैली हे गाणे शिख धर्माचे महान योद्धा हरिसिंग नलवा यांचा मुलगा अर्जन वेल्ली यांच्यावर आधारित आहे. अर्जन वैली यांचा जन्म लुधियानाजवळील काउंके गावात झाला. हरिसिंह नलवा हे महाराजा रणजित सिंग यांच्या खालसा आर्मीचे महान वीर होते आणि त्यांच्या शौर्याची इतिहासात चर्चा आहे.

हरिसिंग खुपच शूर होते. एकदा त्यांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या सिंहाशी लढताना त्याचा खंजीरा खुपसून त्याला ठार मारले होते.

त्यांना अर्जन सिंग आणि जवाहर सिंग अशी दोन मुले होती. या दोघांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा देऊन त्यांचा पराभव केला होता. अर्जन सिंग हा त्याच्या वडिलांसारखा धाडसी होता. या चित्रपटातील गाणे त्यांच्यावर आधारित आहे.

हे गाणे पंजाबी गायक भूपिंदर बब्बल यांनी गायले आहे. सुपरहिट झालेल्या गाण्यात 'वैली' म्हणजे जो युद्धाला घाबरत नाही आणि स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. अर्जनसिंग नलवाचे शौर्य आणि रणांगणावरील त्यांच्या कारनाम्यांचे वर्णन या गाण्यात करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT