Animal Vs Sam Bahadur First Day  esakal
मनोरंजन

Animal Vs Sam Bahadur: बादशाह कोण? अ‍ॅनिमल की सॅम बहादूर कोणी जिंकला बॉक्स ऑफिसचा पहिला दिवस?

कोणत्या सिनेमानं किती कमाई केली हे जाणुन घेऊया .

Vaishali Patil

Animal Vs Sam Bahadur box office collection day 1: 1 डिसेंबर हा दिवस बॉलिवूडसाठी खुप खास ठरला कारण या दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन मोठे सिनिमे प्रदर्शित झाले. एक म्हणजे रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' आणि दुसरा विकी कौशलचा 'सॅम बहादूर'.

दोन्ही सिनेमांनाची चाहते आतुरतेने प्रतिक्षा करत होते. त्यातच काल हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलिज झाले दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मिडियावर या दोन्ही सिनेमांची चांगलीच हवा आहे.

आता या दोन्ही सिनेमांमध्ये कोणत्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. हे जाणुन घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता कोणत्या सिनेमानं किती कमाई केली हे जाणुन घेऊया .

अ‍ॅनिमल

रणबीर कपूरच्या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बंपर कलेक्शन केले आहे. रिलिजपुर्वीच या चित्रपटाची क्रेझ जास्त होती. अ‍ॅडवान्स बुकिंग द्वारेच चित्रपटाने 30 कोटींहून अधिकची कमाई केली होती. आता जाणून घेऊया 'अ‍ॅनिमल'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कोटींची ओपनिंग केली आहे?

'अ‍ॅनिमल'ने पहिल्या दिवशी 33.97 कोटी रुपयांच्या अ‍ॅडवान्स बुकिंग. कलेक्शनसह यावर्षीच्या सर्वच हिट सिनेमांचे रेकॉर्ड मोडले. ज्यात पठाण , टायगर 3 आणि गदर 2 चित्रपटांचा सामावेश आहे.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'Animal' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 61 कोटींची कमाई केली आहे.

यात हिंदीत 50.00 कोटी, तेलुगूमध्ये चित्रपटाचे कलेक्शन 10 कोटी, तमिळमध्ये 0.4 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.09 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 0.01 कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली आहे.

यासह 'अ‍ॅनिमल'ची जगभरात 100 कोटींची ओपनिंग झाली आहे. अ‍ॅनिमल' हा सिनेमा रणबीरच्या करियरमधील सर्वात मोठा ओपनर ठरला.

रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

तर दुसरीकडे या चित्रपटाची स्पर्धा विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' सोबत होती. या चित्रपटाची कथा देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे.

चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटासमोर विकीच्या सॅम बाहादूरने स्पर्धा न करताच हरला आहे.

मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी केवळ 5.50 कोटींची कमाई केली. या आकडेवारीसह 'अ‍ॅनिमल'ने 'सॅम बहादूर'ला कमाईच्या बाबतीच खुपच मागे टाकले आहे.

आता सगळ्यांच्या नजरा वीकेंडच्या कलेक्शनकडे लागल्या आहेत. शनिवार आणि रविवारी 'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' किती कलेक्शन करतात हे पाहाणे उत्सुकतेचे ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT