Animal Vs Sam Bahadur  esakal
मनोरंजन

Animal Vs Sam Bahadur : रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' नं तोडलं रजनीकांतच्या 'जेलर'चं रेकॉर्ड! विकीच्या 'सॅम बहादुर' ला मोठं चँलेंज

प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचा बहुप्रतिक्षित अॅनिमल हा उद्या देशभरामध्ये प्रदर्शित होतो आहे.

युगंधर ताजणे

Animal Vs Sam Bahadur Advance booking box office collection day 1 :

प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचा बहुप्रतिक्षित अॅनिमल हा उद्या देशभरामध्ये प्रदर्शित होतो आहे. त्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांना वेडं केलं होतं. या सगळ्यात अॅनिमनं प्रदर्शनापूर्वीच एक रेकॉर्ड केल्याची बातमी समोर आली आहे.

साऊथमध्ये देवासमान ज्यांना मान दिला जातो, ज्यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक कित्येक तास थिएटरबाहेर ताटकळत असतात, अशा थलायवा रजनीकांत यांच्या गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या जेलर चित्रपटानं मोठा विक्रम केला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. रजनीकांत यांचा चित्रपट म्हटल्यावर त्याला जगभरातून मिळणारा प्रतिसाद मोठा असतो.

Healthy Homes का वाढते आहे आरोग्यपूर्ण घरांची मागणी?

सनीचा गदर आणि रजनी यांचा जेलर हा बरोबर प्रदर्शित झाला होता. मात्र सनीच्या गदरनं बाजी मारल्याचे दिसून आले होते. मात्र रजनी यांच्या जेलरला अॅडव्हान्स बुकींग प्रचंड मिळाले होते. वेगवेगळ्या देशांमधून अॅडव्हान्स बुकींगचा आकडा मोठा होता. आता रणबीरच्या अॅनिमलनं हा रेकॉर्ड ब्रेक केल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. प्रदर्शनापूर्वीच अॅनिमलनं मोठी झेप घेतल्याचे बोलले जात आहे.

अॅनिमलच्या बरोबरीनं विकी कौशलचा सॅम बहादुर देखील प्रदर्शित होतो आहे. त्याला देखील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या रणबीरच्या अॅनिमलचा फिव्हर आहे. जिकडे तिकडे त्याच्या नावाची मोठी चर्चा आहे. अशावेळी येत्या काळात विकीच्या सॅम बहादुरला किती प्रतिसाद मिळतो आणि हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अॅनिलमनं आतापर्यत अॅडव्हान्स बुकींगमधून वीस कोटीं रुपयांची कमाई केली आहे. त्या तुलनेत सॅम बहादुरला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. गुरुवारी सकाळपर्यत हा आकडा एक कोटी ८० लाखांपर्यत जाऊन पोहचला होता. यावरुन रणबीरच्या अॅनिमलची क्रेझ दिसून येईल. रणबीरची अॅनिमल फिल्म ही त्याच्या करिअरमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारी फिल्म आहे. असे म्हटले जात आहे.

रजनीकांत यांच्या जेलरविषयी बोलायचे झाल्यास त्या चित्रपटानं १८.५० कोटींची अॅडव्हान्स कमाई केली होती. अॅनिमल हा त्यापुढे निघून गेला आहे. त्यामुळे हा चित्रपट येत्या काळात बॉक्स ऑफिसवर कमाईचे मोठे विक्रम रचणार अशा चर्चांना उधाण आले आहे.

चित्रपट आणि त्याचे अॅडव्हान्स बुकींग (कोटी रुपयांमध्ये)

टायगर ३ - २३ कोटी, आदिपुरुष - २६.५० कोटी, पठाण - ३२.४३ कोटी, जवान - ४१ कोटी, लिओ - ४६.१० कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

...तर ॲडमिनवरही दाखल होईल गुन्हा! सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ९९ जणांवर कारवाई; सायबर पोलिसांनी हटविल्या ३० पोस्ट; १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT