Anjali Arora fake MMS: लॉकअप फेम(Lockupp Fame) अंजली अरोरा(Anjali Arora) गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चेत आहे. अलीकडेच तिचं 'सइयां दिल मे आना रे' हे गाणं रिलीज झालं आहे, अंजली गाण्याला मिळणारं यश एन्जॉय करतच होती तितक्यात ती एका फेक MMS मुळे चर्चेत आली. त्या व्हायरल MMS वर प्रतिक्रिया देताना ती भावूक झालेली दिसली. आता पुन्हा एकदा अभिनेत्री ट्रोल होताना दिसत आहे.(Anjali Arora fake MMS leak gets badly trolled for her overacting video)
काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका MMS व्हिडीओची चर्चा रंगलेली दिसत आहे. हा व्हिडीओ अंजली अरोराचाच आहे असं बोललं गेलं. पण त्या व्हिडीओत अंजली नव्हतीच,कोणीतरी दुसरी मुलगी होती,जी हुबेहूब अंजलीसारखी दिसत होती. यासंदर्भात स्पष्टिकरण देताना अंजली म्हणाली,''मला माहित नाही का लोक असं माझ्यासोबत करत आहेत. या लोकांनीच मला मोठं केलं आहे. यांचेही कुटुंब असेल,जसं माझं आहे. माझं कुटुंब हे सारे व्हिडीओ पाहतात तेव्हा त्यांना काय वाटत असेल,याचा विचार हे लोक का करत नाही''.
आता मुळ मुद्दयावर येऊया. अंजलीनं फेक एमएमएस वर भावूक प्रतिक्रिया दिल्यानंतर तिला लोकांनी खूप पाठिंबा दिला. अनेकजण तिच्या बाजूने उभे राहिलेले दिसले, पण तेवढ्यात अंजलीनं आपल्या गाण्याचं यश साजरं करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला,ज्यामुळे आता तिला ट्रोल करण्यात येत आहे.
तिनं शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे, अंजली केक कापत आपल्या लेटेस्ट गाण्याला मिळालेलं यश साजरं करत आहे. खूप आनंदात,हसत-हसत अंजली केप कापतेय. आणि मस्करीत ती म्हणताना दिसते की,''सैय्या माझी दृष्ट काढा''. बस मग काय. नेटकऱ्यांना आयतं कोलितच मिळाले. तिचा हा अंदाज नेटकऱ्यांना मुळीच आवडलेला दिसत नाही. यावरनं तिला आता ट्रोल केलं जात आहे.
अंजली अरोराचं स्वतःचीच दृष्ट काढणं लोकांना खटकलं आहे. यानंतर कोणी तिला ओव्हरअॅक्टिंगची दुकान म्हटलं आहे. तर कुणी विचारलं आहे,'का बाई दृष्ट काढायची?' एकानं तर हद्द ओलांडत लिहिलं आहे,'१० सेकंदाची Z ग्रेड अभिनेत्री'. आता ज्याला जे बालायचं ते तो बोलणार. अंजली अरोरानं मात्र या हेटाळणी करणाऱ्या प्रतिक्रियांकडे लक्ष न देणं चांगलंच शिकलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.