Friendship Day 2023: केदार शिंदे - भरत जाधव - अंकुश चौधरी यांची मैत्री सर्वांना माहीतच आहे. केदार - अंकुश - भरत हे गेली २५ हुन जास्त वर्ष एकमेकांसोबत काम करत आहेत. आजवर तिघांनीही आयुष्याचे अनेक चढ - उतार, यश - अपयश एकत्र बघितलेय आहेत.
तिघांची मैत्री मात्र वर्षानुवर्ष अधिक घट्ट होतेय. पण एकवेळ अशी आली होती, केदार - भरतची मैत्री तुटणार होती. पण अंकुश चौधरी होता म्हणुन त्यांची मैत्री तुटली नाही. काय होता हा किस्सा जाणुन घेऊ...
(ankush chaudhari kedar shinde bharat jadhav Friendship Day 2023)
स्वतः भरत जाधव यांनी सोशल मिडीयावर हा किस्सा शेअर केला होता. भरत जाधव लिहीतात, " मी 'सही रे सही' सोडतोय... असं मी १९ वर्षांपूर्वी केदार ला म्हणालो होतो. याला कारण होत 'गोड गोजिरी' गाण. 'श्रीमंत दामोदर पंत' मध्ये आधीच एकदा हे गाणं करून झालं होतं.
आणि केदार ची इच्छा होती की 'सही रे सही' मधील हरी या पात्राची एन्ट्री याच गाण्याने व्हावी. आधीच्या नाटकात वापरलेलं गाण पुन्हा या नव्या नाटकात घेण्याबद्दल मी नाराज होतो.
याला कारण होत की आज जरी 'श्रीमंत दामोदर पंत' हे रसिकांच्या पसंतीच नाटक असलं तरी प्रत्यक्षात रंगभूमीवर या नाटकाला तितकं यश त्या काळी मिळालं नव्हतं.
भरत जाधव यांनी पुढे सांगितलं, "केदार आपल्या निर्णयावर ठाम होता आणि या गाण्यावर न नाचण्यावर मी ठाम होता. शब्दाला शब्द वाढत गेला, अक्षरशः आमच्यात भांडण झाली आणि मी 'सही रे सही' सोडण्याचा निर्णय घेतला.
या भांडणातून तोडगा काढण्यासाठी शेवटी आम्हा दोघांचाही प्रिय मित्र अंकुश चौधरी याने कृष्णशिष्टाई केली. आणि एका प्रयोगा पुरत हे गाणं करून पाहायचं ठरवलं. जर पहिल्या प्रयोगात या गाण्याला चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला तर हे गाणं काढून टाकायचं ठरलं."
भरत जाधव शेवटी लिहीतात, "१५ ऑगस्ट २००२ ला पहिला प्रयोग झाला आणि या गाण्यावर अक्षरशः टाळ्या आणि शिट्ट्यानी नाट्यगृह दणाणून गेल. आजही या गाण्याला वन्स मोअर रिस्पॉन्स मिळतो. गोड गोजिरी वरील दामुचा डान्स आज एक सिग्नेचर स्टेप बनलीये.आणि 'सही रे सही' चा इतिहास सर्वश्रुत आहे.
आज जवळपास ३०-३५ वर्षापासूनची आमची तिघांची मैत्री आहे. जर मी त्या वेळी सही सोडलं असत तर कदाचीत हा सगळा पुढचा प्रवास झालाच नसता. "काही वेळेला आपलं भलं आपल्याला कळतं नसतं पण आपल्या माणसांना कळत असतं."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.