ankush chaudhari said kedar shinde is perfect for shahir sable role maharashtra shahir movie exclusive sakal podcast sakal
मनोरंजन

Maharashtra Shaheer: 'हा'च माणूस शाहीर साबळेंच्या भूमिकेसाठी परफेक्ट होता.. अंकुशने थेट नावच सांगितलं..

नीलेश अडसूळ

Ankush Chaudhari Exclusive about Maharashtra Shahir movie: सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीला आपण सिनेमा,नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या रुपात भेटलोय. पन्नाशी गाठलेला हा अभिनेता आजही तितकाच चिरतरुण आहेम आणि तशा दमदार भूमिकाही तो साकारत असतो. मग दुनियादारीतला दिग्या असो किंवा दगडी चाळ मधला सूर्या.. त्याच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला वेड लावलं.

आता 'महाराष्ट्र शाहीर'चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा आपल्या भेटीला आला आहे. तो शाहीर साबळे यांच्या भूमिकेत असून त्याच्या आयुष्यातील हा पहिला बायोपिक आहे. याच निमित्ताने द मोस्ट यंग अँड हँडसम अंकुश चौधरीशी सकाळ unplugged मध्ये दिलखुलास संवाद साधण्यात आला..

यावेळी अंकुश साकारत असलेल्या शाहीर साबळे यांच्या भूमिके बाबत त्याने एक मोठा खुलासा केला. ही भूमिका त्याच्या ऐवजी आणखी कोणत्या कलाकाराने ती उत्तम साकारली असती यावर अंकुश बोलला आहे.

(ankush chaudhari said kedar shinde is perfect for shahir sable role maharashtra shahir movie exclusive sakal podcast)

केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट जाहीर झाला तेव्हा सगळ्यांच्याच माना उंचावल्या. कारण शाहीर साबळे यांचं संगीत क्षेत्रातलं आणि सामाजिक क्षेत्रातलं काम इतकं मोठं आहे की हा चित्रपट अत्यंत महत्वाचा मानला गेला. त्यामुळेच या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका कोण साकारणार याची उत्कंठा सगळ्यांनाच लागली होती.

आणि अखेर केदार शिंदे यांनी याची घोषणा करत अंकुश चौधरी ही भूमिका करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी अनेकांना थोडा धक्का बसला. कारण शाहीर साबळे यानी अंकुश चौधरी यांच्यात कसलेच साम्य नाही. पण त्याने अत्यंत मेहनतीने ही भूमिका लीलया पेलली आणि सर्वांना सुखद आनंद दिला.

त्याच पार्श्वभूमीवर 'सकाळ डिजिटल' ला दिलेल्या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की, जर तु ही भूमिका साकारली नसती तर कोणता कलाकार असा आहे ज्याने 'शाहीर साबळे' ही भूमिका उत्तम वठवली असती.

असे विचारताच अंकुश म्हणाला, ' या चित्रपटाची प्रक्रिया गेली चार वर्षे सुरू होती. ज्याची मला कल्पना होती. पण मला जेव्हा शाहीर साबळे यांच्या भूमिकेसाठी विचारले तेव्हा धक्का बसला. कारण ही भूमिका स्वतः केदार शिंदे यांनी करावी असं मला वाटत होतं.'

'कारण दोघांचा चेहरा एक आहे, गाणं, नाटक, भारुड केदार अगदी बाबांसारखं करतो. त्यात टॉ त्यांचा नातू आहे. त्यामुळे ही भूमिका त्यानेच उत्तम पद्धतीने साकारली असती आणि न्यायही दिला असता. पण त्याने ही भूमिका मीच साकारावी असा आग्रह धरल्याने मग मी बाबांच्या भूमिकेत आलो,'असं अंकुश यावेळी म्हणाला.

या भूमिकेसाठी काही खास गोष्टी अंकुशला कराव्या लागल्या.त्यासाठी त्याने दीड वर्ष जीवाचं रान केलं. याशिवाय अनेक किस्से असे घडले जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. पण हे सर्व जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या पॉडकास्ट लिंक वर क्लिक करा आणि अंकुशने सांगितलेल्या गुलदस्त्यातल्या गोष्टी नक्की ऐका..


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT