नवी दिल्ली : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर साऊथच्या अन्नपूर्णी या सिनेमामुळं नवा वाद निर्माण झाला आहे. या सिनेतील प्रमुख अभिनेत्री नयनतारा हिच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आता या सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शकाला तुरुंगात टाकावं आणि झी स्टुडिओवर बंदी घालावी, अशी मागणी तेलंगाणातील भाजपचे नेते टी राजा यांनी केली आहे. (annapoorani movie controversy bjp leader t raja demand to amit shah to ban Zee Studio)
टी राजांचा आरोप काय?
टी राजा म्हणाले, "नेटफ्लिक्स आणि झी स्टुडिओवर एक सिनेमा येत आहे अन्नपूर्णी. हा सिनेमा बनवणारे दिग्दर्शक निलेश कृष्णा आणि याची निर्मिती केली आहे झी स्टुडिओनं. या सिनेमाची कथा अशी आहे की, एका पुजाऱ्याची मुलगी एका मुस्लिम तरुणाशी प्रेम करते ज्याचं नाव फरहान दाखवण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
काय आहे वाद?
"यामध्ये हिंदू तरुणी मुस्लिम तरुणाशी प्रेम करते आणि तिला कुराण पठण करायला लावलं जातं. तसेच बिर्याणी बनवण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जातो. तसेच हा हिरो तरुणीला म्हणतो की भगवान रामानंच मांसाहार केला आहे तर तुला खायला काय अडचण आहे, अशी या सिनेमाची कथा आहे. या प्रकरणी झी स्टुडिओनं माफी देखील मागितली आहे. पण माफी मागितल्यानं काही होणार नाही. कारण अनेकदा आपण पाहिलं आहे की हिंदुंच्या भावनांशी खेळ केला जातो. लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे सिनेमे बनवले जातात" असंही टी राजा यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)
२२ जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन
आज केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जग २२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळा धुमधडाक्यात साजरा केला जावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज घराघरात रामायणाचं पठण केलं जात आहे. इतका चांगला माहौल खराब करण्याचं हे एक षडयंत्र आहे. त्यामुळं माझं गृहमंत्री अमित शहांना आवाहन आहे की त्यांनी झी स्टुडिओवर बंदी घालावी.
तसेच अशा प्रकारची कुठलाही सिनेमा जर ओटीटीवर प्रदर्शित होत असेल तर तो सेन्सर झाला पाहिजे. असा सिनेमा बनवण्याचा कोणीही प्रयत्न करणाऱ्यांना जोपर्यंत आपण तुरुंगात टाकत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे चित्रपट बनवण्यापासून कुठलाही दिग्दर्शक किंवा निर्माता सुधरणार नाही, असंही टी राजा यांनी म्हटलं आहे. (Entertainment News in Marathi)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.