Hum Do, Hamare Baarah: नुकताच हम दो हमारे बारह सिनेमाचा पोस्टर रिलीज झाला. या पोस्टरवरनं चांगलाच वाद रंगला. खरंतर हे पोस्टर मुस्लिम समाजाविरोधात भाष्य करतं. या सिनेमाच्या पोस्टरवरनं आणि नावावरनं तरी स्पष्ट होत आहे की देशाची लोकसंख्या वाढली आहे त्यामागे मुसलमान धर्मीयच जबाबदार आहेत. आणि पोस्टरवरही मुस्लिम कुटुंबियच दाखवलं आहे. सिनेमात अनु कपूर महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे. अन्नू कपूर(Annu Kapoor) यांनी या सिनेमाच्या पोस्टरवरनं सुरु असलेल्या वादावर आता प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की,''आमचा हेतू कुणाची भावना दुखवायचा मुळीच नव्हता,किंवा कोणत्याही समाजाची प्रतिमा खराब करण्याचा उद्देशही आमचा नव्हता''.(Annu Kapoor On Hum Do, Hamare Baarah Movie Poster Controversy)
अन्नू कपूर यांना हम दो ,हमारे बाराह संदर्भात सुरु असलेल्या वादा संदर्भात प्रश्न विचारले तेव्हा अन्नू कपूर म्हणाले की,''या सिनेमाशी संबंधित असलेल्या आमच्या टीममधील प्रत्येक माणसाचा कोणत्याच समाजाचा,जाती-धर्माचा अनादर करायचा विचार नव्हता. लोकसंख्येत झपाट्यानं होणारी वाढ हा गंभीर मुद्दा अनेक देशांसाठी मोठी समस्या बनत चालला आहे. कारण प्रत्येक देशाला वाटतं,तिथे राहणारी लोकं खुश राहावीत. जोपर्यंत आपण सगळेच एकत्र एखादी समस्या सोडवण्याचा विचार करणार नाही, जबाबदारी स्विकारणार नाही तोपर्यंत लोकसंख्या वाढीचा मुद्दा कधीच सुटणार नाही''. अन्नू कपूर म्हणाले की,''कोणतीही ठराविक जात,धर्म,पंथ यांना यासाठी जबाबदार धरता येणार नाही. कोणताही मुद्दा जेव्हा मांडायचा असतो मग तो सकारात्मकतेकडे झुकणारा असो किंवा नकारात्मकतेकडे त्यात कोणताही पक्षपातीपण न करता विचार केला पाहिजे''.
'हम दो,हमारे बारह' सिनेमाला कमल चंद्रा यांनी दिग्दर्शित केलं आहे. या सिनेमाचं पोस्टर ५ ऑगस्ट रोजी रिलीज झाले होते. अन्नू कपूर या सिनेमात एका मुस्लिम कुटुंबाचे प्रमुख दाखविले आहेत. त्यांना सिनेमात तब्बल ११ मुलं आहेत. आणि त्यांच्या पत्नीला आणखी एक मुल होणार असतं असं दाखवण्यात आलं आहे. पोस्टरवर लिहिलं आहे,'लवकरच चीनला देखील पाठी टाकू'. याआधी दिग्दर्शक कमल चंद्रा यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं होतं की,''सिनेमाचं पोस्टर मुळीच आक्षेपार्ह नाही. याला योग्य दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. सिनेमातून कोणत्याही एका समाजाला टार्गेट करण्यात आलेलं नाही. मला खात्री आहे जेव्हा लोक हा सिनेमा पाहतील तेव्हा नक्कीच त्यांना सिनेमाचं कथानक,प्रसंग आणि मुद्दे पटतील,ते खूश होतीलटट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.