Anupam Kher and Kirron Kher 
मनोरंजन

किरण खेर यांच्या प्रकृतीविषयी अफवा; अनुपम खेर यांची नेटकऱ्यांना विनंती

सोशल मीडियावर पोस्ट लिहित अनुपम खेर यांनी नेटकऱ्यांना केली विनंती

स्वाती वेमूल

सध्या कोरोनाच्या काळात अनेक दिग्ग्जांच्या निधनाच्या अफवांना पेव फुटले आहेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर Anupam Kher यांच्या पत्नी आणि अभिनेत्री किरण खेर Kirron Kher यांच्या निधनाच्या चर्चा शुक्रवारी संध्याकाळापासून होऊ लागल्या. त्यावर खुद्द अनुपम खेर यांनी पोस्ट लिहित चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्याचप्रमाणे अशा पद्धतीने नकारात्मक बातम्या पसरवू नका, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली आहे. याआधी अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री, तबस्सुम, गायक लकी अली, रामायणातील अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्याही निधनाच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. (Anupam Kher dismisses rumours about his wife Kirron Kher health)

अनुपम खेर यांची पोस्ट-

'किरणच्या प्रकृतीविषयी अफवा पसरत आहे. ते सर्व चुकीचं आहे. तिची प्रकृती ठीक आहे आणि आज दुपारीच तिने कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेतला. मी लोकांना विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारच्या नकारात्मक बातम्या पसरवू नये', अशी पोस्ट खेर यांनी लिहिली.

हेही वाचा : 'मदत करण्याची इच्छा आहे पण, सोनूनं मांडली व्यथा'...

शुक्रवारी अनुपम खेर आणि किरण खेर यांनी लशीचा दुसरा डोस घेतला. त्याचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. किरण यांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या सार्वजनिकरित्या समोर आल्या होत्या. किरण यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती अनुपम खेर यांनी एप्रिलमध्ये दिली होती. किरण यांना मल्टिपल मायलोमा या प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT