Anupam Kher Takes Dig at aamir khan over laal singh chaddha poor box office collection Google
मनोरंजन

Laal Singh Chaddha: अनुपम खेर यांनी आमिरला सुनावलं; म्हणाले,'तू जर आधीच...'

अनुपम खेर यांनी देखील लाल सिंग चड्ढाच्या बॉयकॉट ट्रेंडवर आपलं मत मांडलं आहे. यादरम्यान आता खेर यांचे आमिर विरोधातले एक जुने ट्वीट व्हायरल होत आहे

प्रणाली मोरे

Anupam Kher On Laal Singh Chaddha: आमिर खानचा(Aamir Khan) लाल सिंग चड्ढा बॉक्सऑफिसवर दणकून आपटला आहे. खरंतर,या सिनेमाच्या माध्यमातून आमिर खाननं चार वर्षानंतर सिल्व्हर स्क्रीनवर कमबॅक केलं होतं. पण लोकांनी पूर्णतः या सिनेमाला नापसंती दर्शवल्याचं चित्र आपल्या सर्वांसमोर उभं राहिलंय. लाल सिंग चड्ढाच्या अपयशाने सगळेच हैराण आहेत. कारण सिनेमाला बऱ्यापैकी चांगले रिव्ह्यू मिळूनही प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळाला आहे. आता अनुपम खेर(Anupam Kher) यांनी देखील लाल सिंग चड्ढाच्या बॉयकॉट ट्रेंडवर आपलं मतप्रदर्शन केलं आहे.(Anupam Kher Takes Dig at aamir khan over laal singh chaddha poor box office collection)

अनुपम खेर यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, ''लाल सिंग चड्ढाच्या बॉयकॉट ट्रेंडसाठी कुठे ना कुठे जबाबदार हा स्वतःआमिर खान आहे''. याच मुलाखतीत अनुपम खेर यांनी लाल सिंग चड्ढाला बॉक्सऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नाही यासाठी नकळत आमिरलाच सुनावले आहे. बॉयकॉट ट्रेंडविषयी बोलताना अनुपम खेर म्हणाले,''जर कोणाला वाटतं की बॉयकॉट ट्रेंड सुरू करायला हवा, तर तसं करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. ट्वीटरवर रोजच नवनवीन ट्रेंड येतच असतात''.

इतकंच नाही तर अमुपम खेर यांनी आमिर खानने २०१५ मध्ये केलेल्या असहिष्णुता संदर्भातल्या वक्तव्यावरुनही त्याला सुनावलं आहे. अनुपम खेर म्हणाले,'' तू जर आधीच विचार केला असतास तर. तुम्ही जर तुमच्या भूतकाळात चुकून काही बोलून गेला असाल तर त्या गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात''.

आमिर खान २०१५ मध्ये नवी दिल्लीतील 'रामनाथ गोयंका एक्सीलेंस इन जर्नलिझम अवॉर्ड्स' मध्ये काही असं बोलून गेला होता की,ज्यावर कितीतरी लोकांनी आक्षेप घेतला होता. तो म्हणाला होता की,''तो देशात होणाऱ्या घटनांविषयी चिंतीत आहे. तर त्याची पत्नी किरण रावने देखील त्याला सुचित केलं आहे की आपल्याला भारत देश सोडायला हवा''.

आमिरच्या या वक्तव्यावर त्याला वाईट पद्धतीनं ट्रोल केलं गेलं होतं. अनुपम खेर यांनी देखील याच गोष्टीवरनं आमिरवर निशाणा साधत ट्वीट करत तेव्हा विचारलं होतं की,''तू किरण रावला विचारलं का,तिला कुठल्या देशात जायचं आहे? तू तिला सांगितलस का की या देशानेच तूला द आमिर खान बनवलं आहे?''

'लाल सिंग चड्ढा' आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट होता. पण दुर्दैवाने सिनेमा बॉक्सऑफिसवर चालला नाही. सिनेमाचे कितीतरी शो प्रेक्षकांविना कॅन्सल करावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT