Anuradha Paudwal bollywood Singer Happy Birthday : बॉलीवूडमध्ये आपल्या बहारदार आणि आगळया वेगळ्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या गायिका अनुराधा पौडवाल देशातील लोकप्रिय सेलिब्रेटी आहेत. आज अनुराधाजींचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. अनुराधा पौडवाल यांच्याविषयीच्या अनेक मजेशीर आणि प्रेरणादायी आठवणींना सोशल मीडियावरुन उजाळा देण्यात आला आहे.
भजन गायनापासून सुरुवात झालेल्या अनुराधाजींनी सुगम संगीतात देखील आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली होती. आज केवळ भारतच नाहीतर जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांचे चाहते आहेत. ९० च्या दशकांत अनुराधा पौडवाल यांनी आपल्या आवाजानं चाहत्यांना वेडं केलं होते. त्यांची गाणी ही प्रचंड लोकप्रिय झाली होती. तो आवाज अजुनही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे.
अनुराधाजींनी आता वयाची ६९ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. त्यांनी आपल्या आवाजाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले. अजूनही अनुराधा यांच्या गाण्याला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.
९० च्या दशकांत अनुराधा पौडवाल यांचे करिअर वेगळ्याच उंचीवर होते. त्यावेळच्या सर्वाधिक चर्चेतील गायिका म्हणून त्यांचे नाव घेतले गेले. भजन आणि बॉलीवूडपटांतील गाणी त्यांनी गायली. पहिल्यांदा लोकं त्यांना भजन गाणाऱ्या गायिका म्हणून ओळखत. नंतर त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी गायनाला सुरुवात केली आणि त्या लोकप्रिय झाल्या. त्यांनी अभिमान नावाच्या चित्रपटापासून त्यांच्या बॉलीवूड करिअरला सुरुवात केली होती. त्यात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
अनुराधा यांनी पहिल्यांदा शिवश्लोक गायलं होतं. त्यांनी ते मायक्रोफोन समोर गायलं होतं. एसडी बर्मन यांनी ते कंपोझ केले होते. अनुराधा यांच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड कायम राहिले ते म्हणजे त्यावेळी एका तासांत त्यांच्या ९० हजार कॅसेटची विक्री झाली होती. त्यांनीच एका मुलाखतीमध्ये ही गोष्ट सांगितली होती.
अनुराधा यांनी पहिल्यांदा ‘आऊंगी आऊंगी अगले बरस मैं आऊंगी’ हे देवीचे गीत गायले होते. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्याचवेळी एका तासांच्या आत तब्बल ९० हजार कॅसेटची विक्री झाली होती. त्यांनी आपल्या करिअरमध्ये टी सीरिजसाठी गाणी गायली होती. अनुराधा यांच्या निवडीचे श्रेय गुलशन कुमार यांना दिले जाते.
अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक यांच्यात वाद झाले होते. असेही म्हटले जाते. त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवरही झाला होता. दिल चित्रपटातील गाणी अनुराधा यांनी गायले होते. त्यामुळे तो वाद सुरु झाला होता असे म्हटले जाते. दिलमध्ये आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांनी एकत्र काम केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.