Anurag Gopal Pandey esakal
मनोरंजन

Rani Mukerji : राणी मुखर्जीविषयी बोलताना जीभ घसरली, यशराज फिल्मसच्या दिग्दर्शकाला दाखवला घरचा रस्ता!

युगंधर ताजणे

Anurag Gopal Pandey Viral Video: आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी नेहमीच चाहत्यांच्या मनात घर करुन राहिलेल्या राणी मुखर्जीची गोष्टच वेगळी आहे. तिनं आजवर जितक्या भूमिका केल्या आहेत (Rani Mukherji) त्यातील काही भूमिकांमुळे ती कायमच चर्चेचा विषय राहिली आहे. सध्या राणी मुखर्जी एका वेगळ्या कारणांमुळे बातमीत आली (Viral Video) आहे. त्याला कारण आहे तिच्या कंपनीचा एक सहाय्यक दिग्दर्शक.

सोशल मीडियावर अनुराग गोपाल पांडेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यानं आदित्य चोप्रा आणि त्यांची पत्नी राणी मुखर्जी (Latest Bollywood News) यांच्याविषयी बोलताना अपशब्द बोलताना दिसतो आहे. तो एवढ्यावरच बोलून थांबत नाही तर त्यानं यशराज फिल्मची कास्टिंग डायरेक्टर शानू वर्मासाठी देखील अपशब्द वापरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

यशराज फिल्मस कंपनीचे सहाय्यक दिग्दर्शक अनुराग गोपाल पांडे यांना आता कंपनीनं घरचा रस्ता दाखवला आहे. अनुरागला बॉलीवूडमध्ये चांगल्याप्रकारे ओळखलं जातं. त्यानं यापूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्यांनी एकत्रित सरकार, वीर झारा तसेच रब ने बना दी जोडी सारख्या चित्रपटांत असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

आता अनुराग चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यानं २२ फेब्रुवारी रोजी मनीष मल्होत्रासोबत वाद सुरु केला होता. अनुरागनं त्या व्हायरल व्हिडिओमध्ये आदित्य चोप्रा आणि त्यांची पत्नी अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच्यावर कंपनीनं कारवाई केली आहे. कंपनीनं तातडीनं पोलिसांशी संपर्क साधून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

त्या व्हिडिओनंतर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. यशराज फिल्मसनं अनुरागला घरचा रस्ता दाखवला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग हा त्याच्या कंपनीतील लोकांना देखील सतत अपमानित करत असे. त्यांच्याशी त्याचं असणारं वर्तन बेशिस्तपणाचं होतं. दुसरीकडे अनुराग हा देखील यशराज फिल्मसोबत काही कारणास्तव नाराज होता. त्यामुळे त्यानं हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: रस्ते अडवून वाळीत टाकलं, मराठ्यांवर प्रचंड अन्याय सुरु; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

PM Modi Pune Visit: सिव्हिल कोर्टवरुन स्वारगेटला किती मिनिटांत पोहचणार? पंतप्रधान करणार अंडरग्राउंड मेट्रोचे उद्घाटन

PM Fasal Bima Yojana : रत्नागिरी जिल्ह्याला ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर; आंबा, काजू बागायतदार पात्र

Post Office Schemes : पोस्टाच्या खात्यावर आता मोठ्या रकमेचे व्यवहार,पोस्ट-आयपीपीबीचे खाते करा लिंक

Jammu Kashmir Election: मोदींमुळे पाक सीमेवर शांतता, अमित शहा यांचा दावा; काश्‍मीरमधील घराणेशाहीवर टीका

SCROLL FOR NEXT