anurag kashyap  file photo
मनोरंजन

अँजिओप्लास्टीनंतर अनुरागचा पहिला फोटो व्हायरल; चाहते आश्चर्यचकित

आता अनुराग रूग्णालयामधून घरी परतला आहे

प्रियांका कुलकर्णी

बॉलीवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक, निर्मात आणि अभिनेता अनुराग कश्यपची नुकतीच (anurag kashyap ) अँजिओप्लास्टी (angioplasty) झाली. त्याला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता त्यामुळे उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वैदयकीय सल्लानुसार त्याच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियाही करण्यात आली. आता अनुराग रूग्णालयामधून घरी परतला असून प्रकृती ठीक आहे. त्याची मुलगी आलियाने सोशल मीडियावर अनुरागचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (anurag kashyap daughter aliayah shares directors first picture after angioplasty)

आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनुराग वेगळा दिसत आहे. त्याने डोक्यावरचे केस काढले आहेत. अनुरागच्या या बदलेल्या लूकमुळे त्याचे अनेक चाहते आश्चर्यचकित झाले. आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनुराग स्मित हास्य देताना दिसत आहे. पीटीआयसोबत बोलताना अनुरागच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले, 'अनुरागची अँजिओप्लास्टीच्या झाली आहे. त्याची प्रकृती आता बरी आहे. ज्यांनी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली त्यांचे धन्यवाद'.

anurag kashyap

गैग्स ऑफ वासेपुर, ब्लैक फ्रायडे , रमन राघव 2.0 , देव डी या सुपर हिट चित्रपटाचे दिग्दर्शन अनुरागने केले आहे. लवकरच अनुरागचा दोबारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे..या चित्रपटामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT