Anurag Kashyap: अनुराग कश्यप सध्या त्याच्या 'दोबारा' सिनेमाच्या प्रमोशन मध्ये बिझी आहे. या सिनेमात तापसी पन्नू मुख्य भूमिका साकरताना दिसेल. सिनेमातील मिस्ट्री सध्या चर्चेचा विषय ठरतेय. स्पॅनिश सिनेमा Mirage चा हा ऑफिशिअल रीमेक आहे. यासिनेमा संदर्भात अनुरागनं दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूडवर देखील चांगलेच ताशेरे ओढले आहेत.(Anurag Kashyap recalls he was asked to 'shut up' when he stood up for someone,lack of unity in the Hindi film industry)
आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' आणि अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन' सिनेमाला बॉयकॉट करण्याच्या विषयावर मुकेश भट्ट यांनी काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडमध्ये एकी नाही असं विधान केलं होतं. त्यांच्या याच विधानाची 'री' अनुराग कश्यपनंही ओढली आहे. अनुराग कश्यप म्हणाला आहे,''आपली हिंदी इंडस्ट्री तशीच आहे,इथे एकी नाही. मी अनेकदा यामुळे खूप सहन केलं आहे''.
त्यानं एका प्रसंगाची आठवण करुन देत म्हणाला,''मी एकाची मदत करायला गेलो तेव्हा मला त्यापासून लांब राहण्यास सांगितलं गेलं होतं. मला सांगितलेलं, हा विषय तुझ्याशी संबंधित नाही, यात तू सहभाग घेऊ नकोस, तुझं तोंड बंद ठेव''.
या मुलाखतीत अनुरागने रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंविषयी देखील आपलं मत व्यक्त केलं. आणि खरं तर ते उत्तर थोडं मजेशीरच आहे. तो म्हणाला, ''त्यानं केवळं इंटरनेटचा रेकॉर्ड ब्रेक केला नाही तर त्यानं माझ्या आत्मविश्वासाला देखील धक्का पोहोचवला आहे, आता तो मी कसा परत मिळवू?''
जेव्हा एखादी स्त्री अशाप्रकारचं काही कृत्य करते तेव्हा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो तेव्हा अनुराग कश्यप म्हणाला,''आपण आजही पुरुषप्रधान संस्कृतीत राहतोय''.
पुढे तो म्हणाला, ''आपला भारतच नाही तर सबंध जगात पुरुषप्रधान संस्कृतीच आहे. आपण एक समाज म्हणून खरंतर स्त्रीच्या स्त्रीत्वाचा सम्मान करायला हवा. पण आपण त्या विरोधात वागतो. हे पूर्वपारंपार चालत आलेलं आहे. आपण फक्त विचार करत आलोय आतापर्यंत की हे सगळं एके दिवशी बदलेलं,आणि आपण खऱ्या अर्थानं आधुनिक होऊ. पण हे सगळं पुन्हा मागे पडत चाललं आहे''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.