मुंबई- दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लागल्यानंतर बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये दोन गट पडलेले दिसून आले. एकीकडे अनेक कलाकार अनुरागला पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे काही कलाकार त्याला अटक करण्याची मागणी करत आहेत. यादरम्यान अनुराग कश्यपची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री कल्किने त्याचं समर्थन केलं आहे.
अभिनेत्री कल्कीने अनुराग कश्यपसोबत २०११ मध्ये लग्न केलं होतं. मात्र २०१५ मध्ये हे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. कल्किने अनुराग कश्यपचं समर्थन करत सोशल मिडियावर भली मोठी पोस्ट लिहिली आहे तसंच त्याच्यावरिल आरोपांवर टिका देखील केली आहे.
कल्किने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे. 'प्रिय अनुराग, या मिडिया सर्कसचा तुझ्यावर परिणाम होऊ देऊ नकोस. तुम्ही महिलांच्या स्वातंत्र्यासाठी तुमच्या स्क्रीप्ट्सच्या माध्यमातून लढत आला आहात. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात त्यांच्या प्रामाणिकपणाचं रक्षण केलं आहे. मी याचा पुरावा आहे. तुम्ही तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात मला नेहमी तुमच्या बरोबरीचं मानलं. घटस्फोटानंतरही तुम्ही माझ्या प्रामाणिकपणासाठी उभे राहिलात.'
कल्कीच्या या भल्यामोठ्या पोस्टमध्ये तिने शेवटी म्हटलंय की, 'तुम्ही मोठेपणा सोडू नका. ताकदीने उभा राहा आणि जे काम करत आहात ते करत राहा. पूर्व पत्नीकडून प्रेम'. कल्कीने अनुरागसाठी लिहिलेली ही नोट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. याआधी अनुराग कश्यपची पहिली पत्नी अंजली बजाजनेही त्याचं समर्थन करत सोशल मिडियावर पोस्ट केली होती. तिने तिच्या पोस्टमध्ये अनुरागला रॉकस्टार म्हटलं होतं.
anurag kashyap ex wife kalki koechlin come to support him after harassment allegation on him
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.